१३ तारांकित व ९ लक्षवेधी मांडणार
By Admin | Updated: December 7, 2015 05:38 IST2015-12-07T05:38:16+5:302015-12-07T05:38:16+5:30
सोमवारपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आरमोरी निर्वाचन क्षेत्रातील उद्योग, सिंचन, दुष्काळ,

१३ तारांकित व ९ लक्षवेधी मांडणार
देसाईगंज : सोमवारपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आरमोरी निर्वाचन क्षेत्रातील उद्योग, सिंचन, दुष्काळ, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रातील भेडसावणाऱ्या ज्वलंत प्रश्नांबाबत १३ तारांकित व ९ लक्षवेधी प्रश्न मांडून शासनाचे लक्ष केंद्रीत करून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार क्रिष्णा गजबे शनिवारी देसाईगंज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
देसाईगंज तालुक्यातील १७ गावांची पैसेवारी ५0 टक्क्यांपेक्षा कमी असून या गावांना सरसकट शासनाने आर्थिक मदत करावी, तालुक्यातील नवीन लाडज पूरग्रस्त पुनर्वसित गावाला महसुली गाव गाव घोषित करावे, आरमोरी तालुक्यातील देलनवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा, आरमोरी, कुरखेडा, देसाईगंज, कोरची येथे औद्योगिक विकास महामंडळ द्यावे, रखडलेले कोसरी, येंगलखेडा सिंचन प्रकल्पांना गती द्यावी या प्रमुख मागण्यांसह या क्षेत्रातील टिपागड, खोब्रामेंडा, डोंगरमेंढा, आमगाव, अरततोंडी येथील पर्यटन स्थळांना चालना देण्यात यावी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पॅकेज ऐवजी धानाला प्रती क्विंटल सरसकट दोन हजार रुपये आधारभूत किंमत द्यावी, आरमोरीला नगर परिषदेचा दर्जा द्यावा, ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी आदी प्रश्न लावण्यात आले असून यात एकूण १३ तारांकित व ९ लक्षवेधी प्रश्नांचा समावेश असल्याची माहिती आ. गजबे यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)