जिल्ह्यात १३ कोरोनामुक्त तर १९ नवीन कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:25 IST2021-07-01T04:25:11+5:302021-07-01T04:25:11+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित ३०२५२ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या २९३५४ वर पोहोचली आहे. त्यामुळे सध्या केवळ १५८ सक्रिय रुग्णांवर उपचार ...

13 corona free and 19 new corona free in the district | जिल्ह्यात १३ कोरोनामुक्त तर १९ नवीन कोरोनाबाधित

जिल्ह्यात १३ कोरोनामुक्त तर १९ नवीन कोरोनाबाधित

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित ३०२५२ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या २९३५४ वर पोहोचली आहे. त्यामुळे सध्या केवळ १५८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०३ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण ०.५२ टक्के तर मृत्यूदर २.४५ टक्के आहे.

नवीन १९ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ३, अहेरी तालुक्यातील १, भामरागड तालुक्यातील १, चामोर्शी तालुक्यातील १, धानोरा तालुक्यातील ६, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये १, मुलचेरा तालुक्यातील बाधितांमध्ये ५, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये एकाचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या १३ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील ४, अहेरी १, चामोर्शी ३, धानोरा १, मुलचेरा १, सिरोंचा २, कुरखेडातील एका जणाचा समावेश आहे.

Web Title: 13 corona free and 19 new corona free in the district