जिल्ह्यात १२५ कामे अपूर्ण
By Admin | Updated: October 24, 2015 01:11 IST2015-10-24T01:11:36+5:302015-10-24T01:11:36+5:30
मागास क्षेत्र अनुदान निधी अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात २०१४-१५ या वर्षात १२ तालुक्यात एकूण ६९४ कामे मंजूर करण्यात आली.

जिल्ह्यात १२५ कामे अपूर्ण
बीआरजीएफ : कामे पूर्ण करण्याची ३१ डिसेंबर अंतिम डेडलाईन
गडचिरोली : मागास क्षेत्र अनुदान निधी अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात २०१४-१५ या वर्षात १२ तालुक्यात एकूण ६९४ कामे मंजूर करण्यात आली. यापैकी आतापर्यंत ४०९ कामे पूर्ण झाली असून १२५ कामे अपूर्ण स्थितीत आहे. केंद्र सरकारने बीआरजीएफ योजना गुंडाळली असून या योजनेंतर्गत अपूर्ण असलेली कामे ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत पूर्ण करण्याची डेडलाईन दिली आहे. जिल्ह्यात बीआरजीएफच्या कामात गती नसल्याने १२५ अपूर्ण कामांपैकी मुदत संपेपर्यंत अर्धेअधिक कामे अपूर्ण राहण्याची शक्यता बळावली आहे.
बीआरजीएफची अहेरी तालुक्यात ४० ग्राम पंचायतींमध्ये एकूण ७८ कामे मंजूर करण्यात आली. यापैकी १२ कामे पूर्ण झाली असून पाच कामे अपूर्ण आहेत. आरमोरी तालुक्यात ३४ ग्राम पंचायतींमध्ये ७६ मंजूर कामांपैकी ५८ कामे पूर्ण झाली असून सात कामे अपूर्ण आहेत. भामरागड तालुक्यात मंजूर २१ कामांपैकी ९ कामे पूर्ण झाली असून तीन कामे अपूर्ण आहेत. चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक १०० कामे मंजूर करण्यात आली. यापैकी ७१ कामे पूर्ण झाली असून १९ कामे अपूर्ण स्थितीत आहेत. देसाईगंज तालुक्यात मंजूर ३० कामांपैकी २२ कामे पूर्ण झाली असून पाच कामे अपूर्ण आहेत. धानोरा तालुक्यात मंजूर ८० कामांपैकी ४९ कामे पूर्ण झाली असून १८ कामे अपूर्ण आहेत.
एटापल्ली तालुक्यात मंजूर ४६ कामांपैकी २७ कामे पूर्ण झाली असून १६ कामे अपूर्ण आहेत. एटापल्ली तालुक्यातील ३२ ग्राम पंचायतीमध्ये ४६ कामे मंजूर करण्यात आली. यापैकी २७ कामे पूर्ण झाली असून १६ कामे अपूर्ण आहेत.
गडचिरोली तालुक्यात ५१ ग्राम पंचायतीमध्ये एकूण ७९ कामे मंजूर करण्यात आली. यापैकी ५२ कामे पूर्ण झाली असून १५ कामे अपूर्ण आहेत. कोरची तालुक्यात ३० ग्राम पंचायतीमध्ये मंजूर ३८ कामांपैकी ३३ कामे पूर्ण झाली असून २ कामे अपूर्ण आहेत. कुरखेडा तालुक्यात मंजूर ७० कामांपैकी ४७ कामे पूर्ण झाली असून १९ कामे अपूर्ण आहेत. मुलचेरा तालुक्यात मंजूर ३२ कामांपैकी २३ कामे पूर्ण असून ८ कामे अपूर्ण आहेत. सिरोंचा तालुक्यात ४१ ग्राम पंचायतीमध्ये ४४ कामे मंजूर करण्यात आली. यापैकी ६ कामे पूर्ण झाली असून ८ कामे अपूर्ण आहेत. ग्रा. पं. ने काम पूर्ण करण्यासाठी हालचाली वाढविले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
इतर योजनेतून कामे घेतल्याने १६० कामे रद्द
मागास क्षेत्र अनुदान निधी अंतर्गत २०१४-१५ या वर्षात एकूण ६९४ कामे ग्राम पंचायतस्तरावर मंजूर करण्यात आली. यापैकी १६० कामे ग्राम पंचायतस्तरावर विविध योजनेतून यापूर्वीच घेण्यात आल्यामुळे बीआरजीएफची १६० कामे रद्द करण्यात आली आहे. यामध्ये अहेरी तालुक्यात ६१, आरमोरी ११, भामरागड ९, चामोर्शी १०, देसाईगंज ३, धानोरा १३, एटापल्ली ३, गडचिरोली १२, कोरची ३, कुरखेडा ४, मुलचेरा १ व सिरोंचा तालुक्यातील सर्वाधिक ३० कामांचा समावेश आहे.