जिल्ह्यातील १२ हजार काेराेना याेद्धे दुसऱ्या डाेसच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:35 IST2021-05-15T04:35:09+5:302021-05-15T04:35:09+5:30

गडचिराेली : जिल्हाभरातील २७ हजार २२८ काेराेना याेद्ध्यांनी काेराेना प्रतिबंधात्मक लसचा पहिला डाेस घेतला आहे. त्यापैकी ११ हजार ७७४ ...

12,000 caravans in the district are waiting for the second day | जिल्ह्यातील १२ हजार काेराेना याेद्धे दुसऱ्या डाेसच्या प्रतीक्षेत

जिल्ह्यातील १२ हजार काेराेना याेद्धे दुसऱ्या डाेसच्या प्रतीक्षेत

गडचिराेली : जिल्हाभरातील २७ हजार २२८ काेराेना याेद्ध्यांनी काेराेना प्रतिबंधात्मक लसचा पहिला डाेस घेतला आहे. त्यापैकी ११ हजार ७७४ याेद्ध्यांनी अजूनही दुसरा डाेस घेतला नाही. काही काेराेना याेद्ध्यांची दुसऱ्या डाेजची तारीख यायची आहे. त्यामुळे त्यांनी दुसरा डाेस घेतला नसला तरी अनेकांनी पहिला डाेस घेण्यास उशीर केल्याने त्यांना दुसऱ्या डाेसचे लसीकरण हाेऊ शकले नाही.

देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाचा प्रारंभ झाला. यावेळी फ्रंटलाईन वर्कर व आराेग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याबाबत प्राधान्य देण्यात आले हाेते. जिल्ह्यात जवळपास २८ हजार फ्रंटलाईन वर्कर आहेत. यापैकी १२ मेपर्यंत एकूण २७ हजार २२८ जणांनी लस घेतली आहे. लसीकरणाला प्रारंभ झाल्यापासूनचा कालावधी लक्षात घेतला तर या सर्वांना दुसरा डाेस मिळाला असता, मात्र अनेकांनी पहिला डाेस घेण्यास विलंब केल्याने दुसऱ्या डाेसची तारीख आली नसल्याने त्यांना दुसरा डाेस घेता आला नाही.

बाॅक्स ........

बहुतांश जणांचे लसीकरण

आराेग्य कर्मचारी व इतर विभागाच्या बहुतांश कर्मचाऱ्यांनी आता पहिली लस घेतली आहे; मात्र दुसरी लस घेतली नाही. मध्यंतरी लसचा तुटवडा निर्माण झाला हाेता. तसेच काही जणांनी काेवॅक्सिन लस घेतली हाेती. ही लस मध्यंतरी उपलब्ध झाली नव्हती. त्यामुळेही काही आराेग्य कर्मचाऱ्यांना दुसरी लस मिळाली नाही.

बाॅक्स ..

किती लसीकरण

आराेग्यसेवक

पहिला डाेस - ८,५८२

दुसरा डाेस - ६,४९५

फ्रंटलाईन वर्कर्स

पहिला डाेस - १८,६४६

दुसरा डाेस - ८,९५८

Web Title: 12,000 caravans in the district are waiting for the second day