१२० शिक्षकांना देण्यात आले प्रशिक्षण
By Admin | Updated: September 3, 2015 01:01 IST2015-09-03T01:01:56+5:302015-09-03T01:01:56+5:30
महाराष्ट्र शासनाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद व सर्व खाजगी शाळेतील इयता २ ते ८ विद्यार्थ्यांचे ...

१२० शिक्षकांना देण्यात आले प्रशिक्षण
आरमोरीत प्रारंभ : पायाभूत चाचणी कार्यक्रम
आरमोरी : महाराष्ट्र शासनाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद व सर्व खाजगी शाळेतील इयता २ ते ८ विद्यार्थ्यांचे भाषा व गणित या विषयाची पायाभूत चाचणी घेण्याचे ठरविले आहे. ही चाचणी सप्टेंबर महिन्यात होत आहे. त्याची पूर्व तयारी करण्यासासाठी आरमोरी केंद्रातील १२० शिक्षकाना जि. प. प्राथमिक केंद्र शाळा व महात्मा गांधी विद्यालय येथे दोन टप्प्यात प्रोजेक्टरद्वारे देण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्याध्यापक मदनकर, प्रमुख अतिथी केंद्रप्रमुख जे. टी. नेवारे, बावनकर, सरिता झोडे, सुनंदा गिरीपुंजे आदी होते. या प्रशिक्षणात भाषा व गणित या विषयाची प्रात्यक्षिक, तोंडी, लेखी चाचणी कशाप्रकारे होणार आहे, याचे मार्गदर्शन योगेश वाढई व सुनंदा गिरपुंजे यांनी केले. या पायाभूत चाचणीमुळे विद्यार्थ्यांची पातळी कळणार आहे आणि त्यानुसार त्याला सराव द्यायचा आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जे. टी. नेवारे यांनी तर संचालन योगेश वाढई यांनी केले. आभार गुलाब मने यांनी मानले .