जि.प.साठी १२ तर पं.स.साठी १५ नामांकन
By Admin | Updated: February 1, 2017 00:46 IST2017-02-01T00:46:05+5:302017-02-01T00:46:05+5:30
मंगळवारी जिल्हा परिषदेसाठी १२ नामांकन तर पंचायत समितीसाठी १५ नामांकन दाखल करण्यात आले आहेत.

जि.प.साठी १२ तर पं.स.साठी १५ नामांकन
बुधवारी पडणार अर्जांचा पाऊस : पक्षाकडून उमेदवारी न मिळालेले उमेदवार करणार बंडखोरी
गडचिरोली : मंगळवारी जिल्हा परिषदेसाठी १२ नामांकन तर पंचायत समितीसाठी १५ नामांकन दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. १ फेबु्रवारी हा नामांकन स्वीकारण्याचा शेवटचा दिवस आहे. मंगळवारी कोरची तालुक्यात एक, देसाईगंज तालुक्यात दोन, आरमोरी तालुक्यात दोन, गडचिरोली तालुक्यात तीन, चामोर्शी तालुक्यात पाच असे एकूण १२ नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. पंचायत समितीकरिता कोरची तालुक्यातील कुरखेडा एक, आरमोरी एक, धानोरा एक, गडचिरोली दोन, चामोर्शी सहा, मुलचेरा एक असे एकूण १५ नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. १ फेब्रुवारी हा शेवटचा दिवस असल्याने या दिवशी नामांकन अर्जांचा वर्षाव होणार आहे. आॅनलाईन अर्ज भरण्याचे सर्व्हर डाऊन झाल्याने अनेकांना अर्ज भरण्यास अडथळा निर्माण झाला. त्यामुळे अनेकांनी मंगळवारी अर्ज सादर केले नाहीत. पक्षाकडून उमेदवारी मिळेल या उद्देशाने अनेकांनी नामांकन अर्ज दाखल केला नाही. ज्या उमेदवारांना उमेदवारी मिळाली नाही, असे उमेदवार पक्षाविरोधात बंडखोरी करून अपक्ष नामांकन बुधवारी सादर करणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (नगर प्रतिनिधी)