कुरखेडात १२ लाखांचे रस्ते

By Admin | Updated: September 30, 2015 05:03 IST2015-09-30T05:03:06+5:302015-09-30T05:03:06+5:30

आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे यांच्या स्थानिक विकास निधीतून कुरखेडा शहरात रस्ते बांधकामासाठी

12 lakh roads in Kurkheda | कुरखेडात १२ लाखांचे रस्ते

कुरखेडात १२ लाखांचे रस्ते

कुरखेडा : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे यांच्या स्थानिक विकास निधीतून कुरखेडा शहरात रस्ते बांधकामासाठी १२ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर कामाचा शुभारंभ सोमवारी आ. क्रिष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आला.
रस्ते शुभारंभाच्या कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे, विलास गावंडे, जिल्हा सचिव चांगदेव फाये, तालुका संघटक जलालभाई सय्यद, रामहरी उगले, वामदेवराव सोनकुसरे, बंडू लांजेवार, बबलू हुसैनी, नागेश फाये, अ‍ॅड. उमेश वालदे, अभियंता उसेंडी, उल्हास देशमुख, दीनकर देशमुख, जावेद शेख, शंकर गजबे, दयाराम पेंदाम, सुरेश कांबळे, अब्दुल शेख, सप्तार शेख, नरबहाद्दुर थापा, गंगाधर चेपटे, रवींद्र निनावे, भागवत शिंगनाथ, पुंडलिक हटवार, जगदीश दखणे आदी उपस्थित होते.
दीनकर देशमुख ते दिलीप देशमुख, भाऊराव कढव ते रामहरी उगले, हिरामन पांडव ते शेंडे यांच्या घरापर्यंत प्रत्येकी तीन लाख रूपयांचे सिमेंट काँक्रिट रोड बांधण्यात येणार आहेत. प्रास्ताविक राम लांजेवार तर आभार रवींद्र गोडेफोडे यांनी मानले.

Web Title: 12 lakh roads in Kurkheda