१२ कोविड नियंत्रण कक्ष ठरताहेत गरजवंतांसाठी मार्गदर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:39 AM2021-05-08T04:39:01+5:302021-05-08T04:39:01+5:30

गडचिरोली : कोरोनाच्या स्थितीने शारीरिक आणि मानसिकरित्या भांबावून गेलेल्या रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांसाठी प्रशासनाने सुरू केलेले कोविड नियंत्रण कक्ष ...

12 Kovid Control Room is a guide for the needy | १२ कोविड नियंत्रण कक्ष ठरताहेत गरजवंतांसाठी मार्गदर्शक

१२ कोविड नियंत्रण कक्ष ठरताहेत गरजवंतांसाठी मार्गदर्शक

Next

गडचिरोली : कोरोनाच्या स्थितीने शारीरिक आणि मानसिकरित्या भांबावून गेलेल्या रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांसाठी प्रशासनाने सुरू केलेले कोविड नियंत्रण कक्ष मार्गदर्शक ठरत आहेत. यात जिल्हा मुख्यालयी एक मुख्य नियंत्रण कक्ष आणि ११ तालुक्यांत प्रत्येक एक असे मिळून १२ कोविड नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. या सर्व नियंत्रण कक्षातून रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना चांगल्या प्रकारे मदत आणि मार्गदर्शन मिळत आहे.

कोविड संसर्गामुळे शहरीच नाही तर ग्रामीण भागातही धावपळ सुरू आहे. अशातच रुग्णांच्या नातेवाईकांना मदत मिळावी व गरजूला वेळेत उपचार किंवा बेड उपलब्ध व्हावेत, म्हणून या नियंत्रण कक्षांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे. बहुतेक नातेवाईकांना रुग्णांना भेटता येत नाही, त्यांना भेटणे संसर्गामुळे शक्य नसते. अशा वेळी सदर रुग्णाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी या कोविड नियंत्रण कक्षाची चांगली मदत होत आहे.

लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृहविलगीकरणाचा पर्याय देण्यात येत आहे. सर्व गृहविलगीकरणातील रुग्णांना आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली त्यांच्या घरी ठेवण्यात आले आहे. अशावेळी अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीत या कोविड नियंत्रण कक्षाची मदत होत आहे. संबंधित रुग्णांना दूरध्वनीद्वारे आवश्यक ती मदत दिली जाते. अथवा आपत्कालीन स्थिती असल्यास दवाखान्यात हलविण्यासाठी नियोजन केले जाते.

(बॉक्स)

आतापर्यंत ३०७ नागरिकांनी केला संपर्क

- १ मे पासून आतापर्यंत जिल्हा मुख्यालयातील कोविड नियंत्रण कक्षामध्ये ३०७ नागरिकांनी संपर्क केला. तसेच नियंत्रण कक्षाकडून १५९५ रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक यांना संपर्क करण्यात आला आहे. एप्रिलपासून रुग्णसंख्या वाढल्याने बेडही कमी पडू लागले.

- प्रशासनाकडून बेडची संख्याही वाढविण्यात आली, परंत, काही वेळा ऑक्सिजन बेडची कमतरता भासत आहे. काही रुग्ण प्रतीक्षेत असतात. अशावेळी नेमके रुग्णाला कुठे ॲडमिट करायचे? कुठे बेड उपलब्ध आहे? याचे उत्तर या नियंत्रण कक्षाकडे मिळते.

- आरोग्य विभागाअंतर्गत सनियंत्रणासाठी सर्व रुग्णांची स्थिती संगणकावर अपडेट केली जाते. यातून कोणत्या रुग्णाला कोणत्या वाॅर्डमध्ये ठेवायचे हेही या नियंत्रण कक्षाच्या अहवालावरून समोर येते. यानंतर संबंधित डॉक्टर निर्णय घेतात. यातून बेडची उपलब्धता लक्षात येते.

कोविड नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक

जिल्हा कोविड नियंत्रण कक्ष, गडचिरोली : ०७१३२-२२२०३१, २२२०३०, २२२०३५, धानोरा : ९३५९४०८१२३, आरमोरी : ९४०५२०२०७९, देसाईगंज : ०७१३७- २७२४००, कुरखेडा : ०७१३९- २४५१९९, चामोर्शी : ८२७५९१३१०७, कोरची : ८२७५९३२५९९, मुलचेरा : ०७१३५- २७१०३३, ८२७५८७९९८१, अहेरी : ०७१३३-२९५००१, एटापल्ली : ०७१३६-२९५२१०, भामरागड : ०७१३४-२२००३९, सिरोंचा : ०७१३१- २३३१२९

---

जिल्ह्यातील कोविड दवाखान्यांमध्ये मिळणाऱ्या आरोग्य सुविधांबाबत काही तक्रारी असल्यास नागरिक दिलेल्या संपर्क क्रमांकावर नोंदवू शकतात. बेडची उपलब्धता, गृहविलगीकरणातील रुग्ण अशा विषयांबाबत नागरिक या कोविड नियंत्रण कक्षाकडे संपर्क करू शकतात. नियंत्रण कक्षात ती तक्रार नोंदवून तिचा पाठपुरावा करून तक्रारदाराला माहिती दिली जाते.

- डॉ.विनोद म्हशाखेत्री, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: 12 Kovid Control Room is a guide for the needy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.