विष्णुपूर जंगलातून १२ ड्रम मोहसडवा नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:00 IST2021-05-05T05:00:15+5:302021-05-05T05:00:15+5:30
तालुक्यातील विष्णुपूर येथे १२ अवैध दारूविक्रेते सक्रिय आहेत. यामुळे परिसरातील दारूविक्री बंद असलेल्या गावांना याचा त्रास सहन करावा लागत ...

विष्णुपूर जंगलातून १२ ड्रम मोहसडवा नष्ट
तालुक्यातील विष्णुपूर येथे १२ अवैध दारूविक्रेते सक्रिय आहेत. यामुळे परिसरातील दारूविक्री बंद असलेल्या गावांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या गावातील दारूविक्रेत्यांविरोधात वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. जंगल परिसरात दारू गाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहसडवा टाकला असल्याची माहिती मुक्तिपथ तालुका चमू व चामोर्शी पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार जंगल परिसरात शोधमोहीम राबविली असता १२ ड्रम मोहसडवा टाकलेला दिसून आला. पोलिसांना बघताच घटनास्थळावरून अवैध दारूविक्रेते पसार झाले. संपूर्ण मुद्देमाल घटनास्थळी नष्ट करण्यात आला. संशयित आरोपींविरोधात तपास सुरू असून गावातील इतर अवैध दारू विक्रेत्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय पल्लवी वाघ, संदीप भिवनकर, शालिकराम गिरडकर यांनी केली. यावेळी मुक्तिपथ तालुका संघटक आनंद इंगळे उपस्थित होते.