शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

कामगारांना १.१९ कोटींचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 12:36 AM

बांधकाम क्षेत्रात (जोखमीच्या) काम करणाऱ्या कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जातो. त्याअंतर्गत जिल्ह्यात गेल्या ४ वर्षात १९३७ कामगारांना २५ पेक्षा जास्त योजनांचा लाभ देण्यात आला.

ठळक मुद्देविविध योजना : आतापर्यंत ८४२४ बांधकाम कामगारांची नोंदणी, १९३७ कामगार लाभार्थी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बांधकाम क्षेत्रात (जोखमीच्या) काम करणाऱ्या कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जातो. त्याअंतर्गत जिल्ह्यात गेल्या ४ वर्षात १९३७ कामगारांना २५ पेक्षा जास्त योजनांचा लाभ देण्यात आला. त्यासाठी १ कोटी १९ लाख ८१ हजार रुपये खर्च करण्यात आले.सध्या सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हाभरातील बांधकाम क्षेत्रात काम करणाºया मजुरांची नोंदणी करण्यासाठी अटल विश्वकर्मा अभियान राबविले जात आहे. १९ नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०१८ या कालावधीत राबविल्या जात असलेल्या या अभियानात आतापर्यंत ४५२५ कामगारांची नोंदणी झाली आहे.२०११ मध्ये राज्य शासनाने कामगारांंना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी कामगार मंडळाची स्थापना केली. तेव्हापासून जोखमीच्या क्षेत्रात काम करणाºया कामगारांची नोंदणी करणे सुरू केले. परंतू निधीअभावी योजनांचा लाभ मिळाला नव्हता. २०१४ पासून कामगारांना त्यांच्यासाठी आखलेल्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ देणे सुरू झाले. अटल विश्वकर्मा अभियानांतर्गत कामगारांची नोंदणी सुरू होण्यापूर्वी चार वर्षात ३८९९ कामगारांची नोंदणी कामगार अधिकारी कार्यालयात झाली होती. कामगारांसाठी असलेल्या योजनांचा प्रचार व प्रसार केला जात नसल्यामुळे त्यांना योजनांची माहितीच नव्हती. परिणामी चार वर्षात अवघी ३८९९ कामगारांची नोंदणी झाली. परंतू आता हे अभियान सुरू झाल्यानंतर अवघ्या २० दिवसात ४ हजारावर कामगारांची नोंदणी झाली. कार्यालयामार्फत यापुढेही नोंदणी सुरू राहणार आहे.अधिकारी-कर्मचाऱ्यांची कमतरताजिल्ह्यात मोठे उद्योग नसले तरी छोट्यामोठ्या उद्योगात व बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार बरेच आहेत. परंतू त्यांच्यासाठी असलेल्या सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. यामागील कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता गडचिरोलीत सरकारी कामगार अधिकाऱ्यांसह कर्मचारीच अपुरे असल्याचे दिसून आले. सध्या चंद्रपूरच्या सरकारी कामगार अधिकाऱ्यांकडे गडचिरोलीचा प्रभार आहे. एकच निरीक्षक, दोन लिपीक आणि एक शिपाई नियमित आहे. उर्वरित तीन कर्मचारी कंत्राटी आहेत.जिल्ह्यात बालकामगार नाही?जिल्ह्यात अनेक ठिकाणी बालकामगार काम करताना दिसतात. परंतू कामगार अधिकारी कार्यालयाच्या म्हणण्यानुसार जिल्ह्यात एकही बालकामगार नाही. गेल्या मे महिन्यात याबाबतच्या धाडी टाकून तपासणी करण्यात आली. परंतू एकही बालकामगार आढळला नसल्याचे कामगार निरीक्षकांनी सांगितले.

अशा आहेत कामगारांसाठी योजनानोंदीत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत प्रतिवर्ष २५०० रूपये व आठवी ते दहावीपर्यंत प्रतिवर्षी ५००० रूपये शैक्षणिक, आर्थिक सहाय्य.नोंदीत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास दहावी व बारावीमध्ये ५० टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळाल्यास १० हजार रूपये प्रोत्साहनात्मक शैक्षणिक सहाय्य.अकरावी व बारावीच्या शिक्षणासाठी प्रतिवर्ष १० हजार रूपये शैक्षणिक सहाय्य.नोंदीत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाचा प्रवेश व पुस्तकांसाठी प्रतिवर्ष २० हजार रूपये शैक्षणिक सहाय्य.म.जोतिबा फुले योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या आजाराच्या उपचारासाठी वैद्यकीय लाभ.प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा व सुरक्षा विमा योजनेचा लाभ.