शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
5
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
6
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
7
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
8
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
9
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
10
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
11
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
12
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
13
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

१११ प्रज्ञावंतांचा पदवीने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 1:07 AM

स्थानिक गोंडवाना विद्यापीठाचा सहावा दीक्षांत समारंभ १९ जानेवारी रोजी शनिवारला विद्यापीठाच्या परिसरात प्रशस्त शामियानात पार पडला. याप्रसंगी गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत आचार्य पदवी प्राप्त केलेले ३२ तसेच सुवर्णपदक प्राप्त ३१ व गुणवत्ता प्रमाणपत्रासाठी पात्र ठरलेल्या जवळपास ४८ अशा एकूण १११ प्रज्ञावंतांना पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्दे‘गोंडवाना’चा दीक्षांत समारंभ : चंद्रपुरात विद्यापीठाचे उपकेंद्र होणार असल्याचे कुलगुरूंचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाचा सहावा दीक्षांत समारंभ १९ जानेवारी रोजी शनिवारला विद्यापीठाच्या परिसरात प्रशस्त शामियानात पार पडला. याप्रसंगी गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत आचार्य पदवी प्राप्त केलेले ३२ तसेच सुवर्णपदक प्राप्त ३१ व गुणवत्ता प्रमाणपत्रासाठी पात्र ठरलेल्या जवळपास ४८ अशा एकूण १११ प्रज्ञावंतांना पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.व्ही.कल्याणकर होते. तसेच विशेष अतिथी म्हणून केंद्र सरकारच्या कृषी सहकार व शेतकरी कल्याण विभागाचे तसेच वनस्पती प्रजाती व शेतकऱ्यांचे अधिकार संरक्षण प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.के.व्ही.प्रभू, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.चंद्रशेखर भुसारी, राज्यपालांचे प्रतिनिधी डॉ.सी.डी.माई, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले, विविध विद्या शाखेचे अधीष्ठाता डॉ. एन. एस. कोकोडे, डॉ. आर. पी. इंगोले, डॉ. एस. एस. कावळे, डॉ. एस. एम. साकुरे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन व विद्वत परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे, डॉ.कीर्तीवर्धन दीक्षित, डॉ.प्रदीप घोरपडे, अजय लोंढे, डॉ.हंसा तोमर, डॉ.योगेश दुधपचारे, डॉ.पराग धनकर, डॉ.शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी डॉ.के.व्ही.प्रभू व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन २०१७-१८ या शैक्षणिक सत्रात विविध विषयात आचार्य पदवी उत्तीर्ण २९ प्रज्ञावंतांना पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. विविध विषयात सुवर्णपदक व गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या एकूण ७९ गुणवंतांना सन्मानित करण्यात आले. यावेळी ३१ प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ.कल्याणकर म्हणाले, गोंडवाना विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नीत एकूण २१० महाविद्यालयातून सुमारे ८० हजार विद्यार्थी विविध विद्याशाखांमध्ये शिक्षण घेत आहेत. एकूण नऊ विद्यापीठ पदव्यूत्तर शैक्षणिक विभाग व २१० संलग्नित महाविद्यालय विद्याज्ञानाचे काम करीत आहेत. विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणासाठी विद्यापीठाला काही पायाभूत सुविधांची नितांत आवश्यकता आहे. यासंदर्भात विद्यापीठाने काही उपाययोजनात्मक प्रकल्प सुरू केलेले आहेत. त्याअंतर्गत परीक्षा भवनाचे बांधकाम विद्यापीठाच्या परिसरात लवकरच सुरू होणार आहे. तसेच विज्ञान व तंत्रज्ञान संशोधन केंद्राच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून येत्या काही महिन्यात काम पूर्ण होईल, असे डॉ.कल्याणकर यांनी सांगितले. विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारत तसेच स्वतंत्र पदव्यूत्तर विभागांच्या इमारत बांधकामासाठीचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले आहेत. विद्यापीठाचे प्रशासन व संचालन गतिमान तसेच सर्वसमावेशक होण्याच्या दृष्टीने विद्यापीठाचे उपकेंद्र चंद्रपूर येथे तयार करण्यासाठी प्रयत्न केला जात असून यासाठी चंद्रपूरजवळ ५० एकर जमिनीचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे, असेही डॉ.कल्याणकर यांनी सांगितले.विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने सदर कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध नियोजनबद्ध व वेळेत पार पाडण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर, डॉ.शिल्पा आठवले यांनी केले. कार्यक्रमाला विद्यापीठाचे विविध विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी तसेच संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.३२ जणांचा आचार्य पदवीने सन्मानगोंडवाना विद्यापीठाअंतर्गत चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यातील तब्बल २९ जणांनी विविध विषयावर आचार्य पदवी उत्तीर्ण केली. या प्रज्ञावंतांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये पुरूषोत्तम शोभणे (गणित), जयकुमार पुरोहित (संगणकशास्त्र), वेणुगोपाल नरसिंगगोजू (संगणकशास्त्र), प्रवीण भाड (गणित), ओमप्रकाश बेरडेवाढ (गणित), अमित सेटीया (वनस्पतीशास्त्र), चंद्रकुमार पटले (वनस्पतीशास्त्र), अर्चना कनोजिया (रसायनशास्त्र), योगीता हटवार (रसायनशास्त्र), रोशन फुलकर (व्यवसाय अर्थशास्त्र), विलास पेटकर (मराठी), स्निग्धा खोब्रागडे (समाजशास्त्र), मंगेश रणदिवे (राज्यशास्त्र), सेबास्टीन कुलथासेरी (इंग्रजी), कविता राजुरकर (इंग्रजी), नीलेश ढेखरे (इंग्रजी), सुधांशू रॉय (हिंदी), माधुरी ब्राह्मणे (इंग्रजी), कमल बारसे (समाजशास्त्र), रूपेंद्र गौर (समाजशास्त्र), जंग बहादूर (शारीरिक शिक्षण), दिगांबर सिंग बिश्त (शारीरिक शिक्षण), आकाश दीपमुनी (मास कमुनीकेशन), वंदना सिंग (शिक्षणशास्त्र), रेखा जिभकाटे (शिक्षणशास्त्र), रजनी शिवणकर (शिक्षणशास्त्र), प्रशांत मुंगळे (शिक्षणशास्त्र), अनिल मोरे (शिक्षणशास्त्र), उर्मिला व्यवहारे (शिक्षणशास्त्र), सुजाता रामटेके (शिक्षणशास्त्र), उखवत नवशिन (शिक्षणशास्त्र), शंकर कदम (ग्रंथालय व माहिती विज्ञान) आदींचा समावेश आहे.३१ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदानसुवर्णपदक प्राप्त ३१ विद्यार्थ्यांमध्ये रोहित मेश्राम, अमोल मोहुर्ले, राहुल रामटेके, गुरूनानक शिवरकर, (बॅचलर आॅफ सायन्स), अश्विनी पंचभाई (सायन्स इन इलेक्ट्रॉनिक्स), आकाश पिंपळकर (बॅचलर आॅफ कॉमर्स), मानवी आकेवार (वाणिज्य व व्यवस्थापन), शीतल आगडे (भूगोल), स्वाती संतपुरीवार (हिंदी वाङ्मय), आकाश गेडाम (राज्यशास्त्र), पुष्पा बावणे (मानसशास्त्र), सोनी सेगाम (संगीत), हिना सहारे (डॉ.आंबेडकर विचारधारा), पल्लवी अडपवार (इंग्रजी), गुडियादेवी त्रिपाठी (हिंदी), मोहिनी परशुरामकर (मराठी), सागर गेडाम (मराठी), मयुरी लाडे (पॉली व प्राकृत), सुजाता मोरांडे (राज्यशास्त्र), विजय लांडे (बॅचलर आॅफ लॉ), कांचन भिंगरदिवे (बॅचलर आॅफ लॉ), पठाण निकिशा नाज अशरफ खान (बॅचलर आॅफ लॉ), आरती भगत (बॅचलर आॅफ लॉ), स्मिता बांबोळे (बॅचलर आॅफ एज्युकेशन), पूजा तलांडे (मास्टर आॅफ एज्युकेशन) आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.सामूहिक बियाणे बँका उभ्या करा- डॉ.के.व्ही.प्रभूभारतीय अर्थव्यवस्था, उद्योगधंदे आणि समाज यांचा विकास शेती व्यवस्थेवर अवलंबून आहे. परंतू पारंपरिक बियाणे लोप पावल्याने शेतकºयांची दुरवस्था झाली आहे. सेंद्रिय, जैविक साधनांचे संवर्धन करून सामूहिक बियाणे बँका उभ्या करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या कृषी, सहकार व शेतकरी कल्याण विभागाचे तसेच वनस्पती प्रजाती व शेतकºयांचे अधिकार संरक्षण प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.के.व्ही.प्रभू यांनी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात केले. मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत शेती, मत्स्य, मधमाशी, कृषी तसेच वनोपजावर आधारित अभ्यासक्रम सुरू करणे आवश्यक आहे. जेणेकरून गडचिरोली जिल्ह्याचा विकास होण्यास मदत होईल. यातून संशोधक विद्यार्थ्यांना करिअरची चांगली संधी आहे. त्यादृष्टीने शासनस्तरावरून प्रयत्न झाले पाहिजे, असेही डॉ.के.व्ही.प्रभू यावेळी म्हणाले.

टॅग्स :universityविद्यापीठ