१,१०० युवकांना मिळाला रोजगार

By Admin | Updated: September 4, 2016 01:56 IST2016-09-04T01:56:04+5:302016-09-04T01:56:04+5:30

स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने २०१० ते २०१६ या कालावधीत सुमारे १ हजार ८०१ युवकांना व्यवसायाचे प्रशिक्षण दिले

1,100 youth got employment | १,१०० युवकांना मिळाला रोजगार

१,१०० युवकांना मिळाला रोजगार

आरसेटीचा उपक्रम : सहा वर्षांत १ हजार ८०१ बेरोजगारांना व्यवसायाचे प्रशिक्षण
गडचिरोली : स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने २०१० ते २०१६ या कालावधीत सुमारे १ हजार ८०१ युवकांना व्यवसायाचे प्रशिक्षण दिले असून त्यापैकी सुमारे १ हजार १०० प्रशिक्षणार्थ्यांनी स्वत:चा रोजगार सुरू केला आहे.
प्रत्येकच युवकाला शासकीय नोकरी देणे शक्य नाही. त्यामुळे युवकांनी स्वयंरोजगाराकडे वळावे, यासाठी शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. अनेक विभागांच्या वतीने युवकांना व्यवसायाबाबतचे प्रशिक्षणही दिले जात आहे. गडचिरोली येथे स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेची स्थापना २०१० साली करण्यात आली. सुरूवातीचे दोन ते तीन वर्ष युवकांना फारसे प्रशिक्षण देण्यात आले नाही. मात्र मागील दोन वर्षांपासून आरसेटीने प्रत्यक्ष काम करण्यास सुरूवात केली आहे. सध्या या संस्थेला एए रँकींग प्राप्त झाले आहे. आरसेटीच्या निर्मितीपासून ते आॅगस्ट २०१६ पर्यंत जिल्हाभरातील सुमारे १ हजार ८०० युवकांना प्रशिक्षण उपलब्ध करून दिले आहे. प्रशिक्षण दिल्यानंतर संबंधित युवकाने रोजगार टाकावा, यासाठी आरसेटीच्या वतीने इतरही मदत केली जाते. त्यामुळे या संस्थेच्या मार्फतीने प्रशिक्षण घेणारे युवक पुढे चालून रोजगार स्थापन करतात. १ हजार ८०१ प्रशिक्षणार्थ्यांपैकी सुमारे १ हजार १०० प्रशिक्षणार्थ्यांनी स्वत:चा रोजगार सुरू केला आहे. काही युवकांचा व्यवसाय वाढला असल्याने त्यांनी स्वत:च्याच व्यवसायात दोन ते तीन युवकांना कामावर ठेवले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष रोजगार करणाऱ्यांची संख्या वाढण्यास मदत झाली आहे. आरसेटीचा विभाग ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकारच्या वतीने चालविण्यात येते. स्वयंरोजगार निर्मितीतील अडथळे दूर होत असल्याने आरसेटीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

Web Title: 1,100 youth got employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.