दाेन मृत्यूसह नवीन ११ काेराेनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:47 IST2021-06-16T04:47:56+5:302021-06-16T04:47:56+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या २९ हजार ९२३ झाली आहे. त्यापैकी कोरोनामुक्त २८ हजार ८६४ जणांनी कोरोनावर मात केली. ...

11 new carnage affected with death | दाेन मृत्यूसह नवीन ११ काेराेनाबाधित

दाेन मृत्यूसह नवीन ११ काेराेनाबाधित

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या २९ हजार ९२३ झाली आहे. त्यापैकी कोरोनामुक्त २८ हजार ८६४ जणांनी कोरोनावर मात केली. तसेच सद्या ३२३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण ७३६ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. सोमवारच्या २ मृत्युमध्ये ६९ वर्षीय पुरुष ता.मुल जि.चंद्रपूर आणि ६० वर्षीय पुरुष विसापूर, गडचिरोली यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.४६ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण १.५ टक्के तर मृत्युदर २.४६ टक्के झाला आहे.

(बॉक्स)

सहा तालुक्यात नवीन रुग्ण

नवीन ११ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील २, अहेरी तालुक्यातील १, आरमोरी २, चामोर्शी तालुक्यातील ३, एटापल्ली तालुक्यातील २, सिरोंचा तालुक्यातील एका जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या ४७ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील ८, अहेरी ५, आरमोरी ३, भामरागड ४, चामोर्शी ३, एटापल्ली १, मुलचेरा १२, सिरोंचा ७, कुरखेडा १ तसेच देसाईगंज येथील ३ जणांचा समावेश आहे.

Web Title: 11 new carnage affected with death