११ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त
By Admin | Updated: February 5, 2017 01:31 IST2017-02-05T01:31:24+5:302017-02-05T01:31:24+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या मोहिमेत

११ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त
आमगावनजीक सापळा : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
देसाईगंज : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या मोहिमेत अवैधरित्या दारूची तस्करी करणाऱ्या वाहनास पकडून ११ लाख ६५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकास मिळालेल्या माहितीनुसार पथकाने शनिवारी ४ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास लाखांदूर- देसाईगंज मार्गावर पाळत ठेवली. यावेळी संशयीत वाहन क्रमांक एमएच २४ पी ५१५१ हे लाखांदूर मार्गाने देसाईगंजकडे येताना दिसले. या वाहनास सावंगी गावाजवळ अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहनचालकाने सुसाट वेगाने वाहन पळविले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने वाहनाचा पाठलाग करून वाहनास आमगावजवळ थांबविले. यावेळी वाहनचालक वाहन सोडून पसार झाला. वाहनाची झडती घेतली असता देशी सुप्रिम कंपनीच्या ४४ पेट्या दारू अंदाजे किंमत २ लाख २० हजार व देशी दारू संत्राच्या १९ पेट्या अंदाजे किंमत ९५ हजार एवढा दारूसाठा आढळून आला. ही दारू तस्करी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या ८ लाख ५० हजार रूपयांच्या टोयोटा इन्होव्हा कार सहीत एकूण ११ लाख ६५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निबंधक टी. बी. शेख, सहायक दुय्यम निरीक्षक जी. पी. गजभिये, एस. एम. गव्हारे, व्ही. पी. शेंदरे, व्ही. पी. महाकूलकर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)