ट्रॅक्टर टाली उलटल्याने ११ मजूर जखमी
By Admin | Updated: December 24, 2015 02:05 IST2015-12-24T02:05:15+5:302015-12-24T02:05:15+5:30
टॉवर लाईनच्या कामासाठी कोरचीवरून कुरखेडाकडे ट्रॅक्टरने मजूर घेऊन जात असताना ट्रॅक्टरची ट्राली उलटल्याने ११ मजूर जखमी ...

ट्रॅक्टर टाली उलटल्याने ११ मजूर जखमी
जांभुळखेडा नजीकची घटना : टॉवर लाईनच्या कामावरील होते मजूर
कुरखेडा : टॉवर लाईनच्या कामासाठी कोरचीवरून कुरखेडाकडे ट्रॅक्टरने मजूर घेऊन जात असताना ट्रॅक्टरची ट्राली उलटल्याने ११ मजूर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास कोरची-कुरखेडा मार्गावर जांभुळखेडा गावानजीक घडली.
सुदीतीर सरकार (५०), कोतफ सरकार (३५), शबाना मंडल (४०), गोपाल कोन, भीमलखान सरकार, शुलू राजवंशी (६०), बैद्यनाथ सरकार (५०), समीर परयानीक (२०), बबलू हजदा (२०), संतोष मंडल (११) व रंजीत घोष (५२) सर्व रा. पश्चिम बंगाल हे ११ मजूर जखमी झाले. या सर्व जखमींना कुरखेडाच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची कुरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास कुरखेडा पोलीस करीत आहे. मोठ्या टॉवर लाईनच्या कामासाठी ट्रॅक्टरने मजूर नेण्यात येत होते. दरम्यान या ट्रॅक्टरमध्ये बिघाड निर्माण झाल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या खाली उतरली व ट्राली पूर्णत: उलटली. यात ११ मजूर जखमी झाले. (तालुका प्रतिनिधी)