शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

१०११ शाळांना जोडले

By admin | Updated: September 25, 2014 23:22 IST

यावर्षीपासून नव्याने सुरू करण्यात आलेल्या मॅपिंग योजनेमुळे जिल्ह्यातील प्रत्येक शाळेचे लोकेशन (ठिकाण) महाराष्ट्र शासनाच्या संचालक कार्यालयाला पुणे येथे सहज कार्यालयात बसून संगणकावर उपलब्ध होणार आहे.

शाळांची स्कूलमॅपिंग : शाळांची आॅनलाईन मिळणार माहितीदिलीप दहेलकर - गडचिरोलीयावर्षीपासून नव्याने सुरू करण्यात आलेल्या मॅपिंग योजनेमुळे जिल्ह्यातील प्रत्येक शाळेचे लोकेशन (ठिकाण) महाराष्ट्र शासनाच्या संचालक कार्यालयाला पुणे येथे सहज कार्यालयात बसून संगणकावर उपलब्ध होणार आहे. सध्य:स्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील १ हजार ११ शाळा स्कूल मॅपिंग योजनेने जोडण्यात आल्या आहेत. यामुळे शाळांची माहिती संगणकावर मिळणार असून शाळांचा विकास साधण्यासाठी मदत होणार आहे.स्कूल मॅपिंग व युडाईस प्रणालीमुळे सर्व शिक्षा अभियानाला अधिक पारदर्शकता प्राप्त होऊन शालापयोगी अनेक योजना राबविणे सोपे जाणार आहे. तसेच खऱ्या अर्थाने शिक्षणाचा व विद्यार्थ्यांचा दर्जा विकसीत होणार आहे. शाळांचे स्थान (लोकेशन) बाबत संचनालय कार्यालयात अथवा सचिवालय कार्यालयात बसल्या ठिकाणी माहिती व्हावी, या उद्देशाने स्कूल मॅपिंग नावाच्या संगणकीय प्रणालीला जोडण्याची प्रक्रिया युध्दपातळीवर सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात सर्व प्रकारच्या, सर्व माध्यमांच्या, सर्व अभ्यासक्रमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या मिळून एकूण २ हजार ८० प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळा स्कूल मॅपिंग योजनेत जोडण्याची प्रक्रिया मे २०१४ मध्ये सुरू करण्यात आली. मात्र या संगणकीय प्रणालीच्या सॉफ्टवेअरमध्ये अडचणी आल्यामुळे सदर प्रक्रिया काही दिवसासाठी रद्द करण्यात आली होती. त्यानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने स्कूल मॅपिंगसाठी नवीन संगणकीय सॉफ्टवेअर कार्यान्वित केले. त्यानंतर संपूर्ण राज्यभरात १ आॅगस्टपासून स्कूल मॅपिंग योजनेला नव्याने सुरूवात झाली. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मिळून एकूण १ हजार ११ शाळा स्कूल मॅपिंगने जोडण्यात आल्याची माहिती जि. प. च्या शिक्षण विभागाकडून मिळाली आहे. स्कूल मॅपिंगमध्ये शाळांची भौतिक सुविधा, कार्यरत शिक्षक तसेच दाखल विद्यार्थी व शालेय शिष्यवृत्तीची माहिती अपडेट केल्या जात आहे. सदर कार्यवाही शाळांचे मुख्याध्यापक व केंद्र प्रमुखांद्वारे सुरू आहे. स्कूल मॅपिंगकरीता संबंधीत शाळांच्या मुख्याध्यापकांकडे तसेच केंद्र प्रमुखांकडे स्मार्ट फोन, जीपीएस सिस्टीम व थ्रीजी सेवा असणे अत्यावश्यक आहे. शालेय शिक्षण विभागाने स्कूल मॅपिंगकरिता सन २०१२ पासून युडाईस हे सॉफ्टवेअर कार्यान्वित केले आहे. जिल्ह्यातील तसेच राज्यातील सर्व शाळांची स्कूल मॅपिंग पूर्ण झाल्यावर बफर झोन तयार करण्यात येणार आहे. गावापासून एक किमी अंतरावर एक प्राथमिक शाळा गावापासून ३ किमी अंतरावर उच्च प्राथमिक शाळा तसेच गावापासून ५ किमी अंतरावर एक माध्यमिक शाळा असावी, अशी तरतूद शिक्षणाच्या अधिकार अधिनियमात नमूद आहे. दोन शाळांचे अंतर अधिक असू नये, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गावाच्या लोकसंख्येनुसार तसेच अंतरानुसार कोणकोणत्या गावात शाळांची गरज आहे, हे तपासल्या जाणार आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार शासनामार्फत नवीन शाळांची निर्मिती करण्यात येणार आहे.नेटवर्क अभावी १ हजार ६९ शाळा स्कूल मॅपिंगच्या प्रतीक्षेतनेटवर्क राहत नसल्याने जिल्हाभरातील १ हजार ६९ शाळा गेल्या दीड महिन्यापासून स्कूल मॅपिंगच्या प्रतीक्षेत आहे. वारंवार नेटवर्कचा अभाव राहत असल्याने दुर्गम भागातील शाळांची अद्यापही मॅपिंग करण्यात आली नाही. विशेष म्हणजे कुरखेडा, धानोरा, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, कोरची व भामरागड आदी दुर्गम तालुक्यात नेटवर्कची समस्या कायमच आहे. त्यामुळे या तालुक्यातील अनेक शाळा स्कूल मॅपिंगच्या प्रतीक्षेत आहे. सर्वाधिक एटापल्ली तालुक्यातील २०६ शाळांची तसेच त्याखालोखाल धानोरा तालुक्यातील १९७ शाळांची स्कूल मॅपिंंग अद्यापही करण्यात आली नाही. स्कूल मॅपिंग करिता नेटवर्कची व्यवस्था करणे गरजेचे आहे.