बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्यास १० वर्षांचा सश्रम कारावास

By Admin | Updated: April 22, 2017 01:16 IST2017-04-22T01:16:53+5:302017-04-22T01:16:53+5:30

शेतात तुरीच्या शेंगा तोडत असलेल्या महिलेचा हात पकडून तिच्यावर बळजबरीने बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस

10 years of rigorous imprisonment for attempting rape | बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्यास १० वर्षांचा सश्रम कारावास

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्यास १० वर्षांचा सश्रम कारावास

जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
गडचिरोली : शेतात तुरीच्या शेंगा तोडत असलेल्या महिलेचा हात पकडून तिच्यावर बळजबरीने बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस गडचिरोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षांचा कारावास ठोठावला आहे. दादाजी झुंगाजी कांबळे (४०) रा. मोहुर्ली ता. चामोर्शी असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, ११ जानेवारी २०१५ रोजी पिडीत महिला आपल्या मोहुर्ली येथील शेतात तुरीच्या शेंगा तोडत असताना आरोपी दादाजी कांबळे याने मागून जावून तिचा हात पकडला. तू मला आवडतेस असे म्हणून त्याने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिचे तोंड दाबून तिला बांदीमध्ये ढकलून दिले. पिडीतेने ओरडण्याचा प्रयत्न केला असता जोराने तोंड दाबून धरले. यामुळे तिला जखमा झाल्या. पिडीतेने चामोर्शी पोलिस ठाणे गाठून आरोपीविरूध्द तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम ३७६ (१) , ५११ भादंवी अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपीला याच दिवशी अटक करण्यात आली. गुन्ह्याचा तपास पुर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयात साक्षीदारांचे बयाण नोंदवून सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीला शुक्रवार २१ एप्रिल रोजी १० वर्ष सश्रम कारावास व ३ हजार रुपए दंड ठोठावला आहे. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता निलकंठ भांडेकर यांनी काम बघितले. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक मनोजकुमार नवसरे यांनी केला. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक जयेश खंदरकर यांनी काम बघितले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: 10 years of rigorous imprisonment for attempting rape