शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास १० वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:24 AM

मोबाईल चार्ज करण्याच्या बहाण्याने घरात शिरून तिथे असलेल्या अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. नागेश समय्या मडे (२२) रा.वियमपल्ली, ता.सिरोंचा असे आरोपी युवकाचे नाव आहे.

ठळक मुद्देदोन हजाराचा दंड : जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मोबाईल चार्ज करण्याच्या बहाण्याने घरात शिरून तिथे असलेल्या अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. नागेश समय्या मडे (२२) रा.वियमपल्ली, ता.सिरोंचा असे आरोपी युवकाचे नाव आहे.२९ एप्रिल २०१६ या दिवशी ८ वर्षीय पीडित मुलगी घरी एकटीच असल्याची संधी साधून आरोपी नागेश मडे हा मोबाईल चार्ज करण्याच्या बहाण्याने तिच्या घरी गेला. तिला आतील खोलीत नेऊन अतिप्रसंग केला. शिवाय झालेल्या प्रकाराची माहिती कुणाला दिल्यास जिवानिशी ठार करण्याची धमकीही दिली. तिने आपल्या आईला आपबिती सांगितली.आईच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी नागेश मडे याच्यावर भादंवि कलम ३७६ (२), ५०६ व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ६ अन्वये गुन्हा दाखल केला.तत्कालिन पोलीस निरीक्षक दीपक लुकडे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. शुक्रवारी या प्रकरणाचा निकाल लागला. जिल्हा व सत्र न्यायालयाने बचाव पक्षाचे बयाण नोंदवून व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी नागेश यास दोषी ठरवून १० वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड, तसेच कलम ५०६ अन्वये १ वर्षाचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सदर निकाल प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश एस. जी. मेहरे यांनी दिला.सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान व सहायक सरकारी वकील नीळकंठ भांडेकर यांनी काम पाहिले.

टॅग्स :Rapeबलात्कारjailतुरुंग