१० हजार मनुष्य दिवस रोजगार निर्मिती

By Admin | Updated: July 9, 2014 23:27 IST2014-07-09T23:27:07+5:302014-07-09T23:27:07+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत चांभार्डा येथे ५० टक्के ग्रामपंचायत स्तरावर रोजगार हमी योजनेअंतर्गत १० हजार मनुष्य दिवस रोजगार निर्मिती १ जानेवारी ते ३० जून

10 thousand man days employment generation | १० हजार मनुष्य दिवस रोजगार निर्मिती

१० हजार मनुष्य दिवस रोजगार निर्मिती

गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत चांभार्डा येथे ५० टक्के ग्रामपंचायत स्तरावर रोजगार हमी योजनेअंतर्गत १० हजार मनुष्य दिवस रोजगार निर्मिती १ जानेवारी ते ३० जून या कालावधीत करण्यात आली. गावातील २०० च्यावर कुटुंबांना मागणीनुसार काम मिळाले. रोजगार हमीच्या कामासाठी १८ लाख ५ हजार १३४ रूपयाचा निधी खर्च झाला.
जिल्हा परिषद सिंचाई उपविभाग गडचिरोली अंतर्गत सर्व्हे नं. ११२ तलावाचे नहर दुरूस्तीचे काम करण्यात आले. या कामावर २ लाख १७ हजार १३७ अकुशल तर ७ हजार ३५ कुशल साहित्य १ हजार ९८२ असा एकूण २ लाख २६ हजार १५४ रूपयाचा निधी खर्च करून १ हजार ५०६ मनुष्य दिवस रोजगार निर्मिती करण्यात आली. चांभार्डा येथील २४५ कुटुंबापैकी २०० कुटुंबांना मागणीनुसार रोजगार मिळाला. त्यापैकी १७ कुटुंबांना १०० दिवसापेक्षा अधिक रोजगार मिळाला. सदर काम ग्रामसेवक पी. पी. निंदेकर, रोजगार सेवक विलास ठाकरे, सरपंच संतोष म्हशाखेत्री यांच्या देखरेखीखाली करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 10 thousand man days employment generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.