जिल्ह्यात अजून १० काेराेनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:23 AM2021-07-22T04:23:29+5:302021-07-22T04:23:29+5:30

गडचिराेली : काेराेना संसर्गाची दुसरी लाट ओसरली असली तरी काेराेनाचे संकट पूर्णपणे टळलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात अजूनही कोरोनाचे रुग्ण ...

10 more carnage affected in the district | जिल्ह्यात अजून १० काेराेनाबाधित

जिल्ह्यात अजून १० काेराेनाबाधित

Next

गडचिराेली : काेराेना संसर्गाची दुसरी लाट ओसरली असली तरी काेराेनाचे संकट पूर्णपणे टळलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात अजूनही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. बुधवारी (दि.२१) जिल्हाभरात नवीन १० काेराेनाबाधित रुग्ण आढळून आले. ३ जणांनी काेराेनावर मात केली असून अजून ९५ जणांवर उपचार सुरूच आहेत.

नवीन १० बाधित रुग्णांमध्ये चामाेर्शी तालुक्यातील ५, धानाेरा तालुक्यातील ५ रुग्णांचा समावेश आहे. चामाेर्शी, धानाेरा व मुलचेरा येथील प्रत्येकी १ रूग्ण काेराेनामुक्त झाला.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित ३० हजार ५३५ रुग्णांपैकी काेराेनामुक्त झालेली संख्या २९ हजार ६९७ वर पाेहाेचली आहे. सद्य:स्थितीत क्रियाशील ९५ काेराेनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात काेराेना रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ९७.२६ टक्के, क्रियाशील रुग्णांचे प्रमाण ०.३१ टक्के आहे. मृत्युदर २.४३ टक्के झाला आहे.

Web Title: 10 more carnage affected in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.