गाेगावातून १० लिटर माेहफूल दारू केली जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:25 IST2021-07-21T04:25:09+5:302021-07-21T04:25:09+5:30
गडचिरोली : तालुक्यातील गोगाव येथील अवैध दारू विक्रेत्याच्या घरी धाड टाकून १० लिटर मोहफुलाची दारू जप्त केल्याची कारवाई गडचिरोली ...

गाेगावातून १० लिटर माेहफूल दारू केली जप्त
गडचिरोली : तालुक्यातील गोगाव येथील अवैध दारू विक्रेत्याच्या घरी धाड टाकून १० लिटर मोहफुलाची दारू जप्त केल्याची कारवाई गडचिरोली पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या शनिवारी केली. राहुल रायपुरे (३९) या विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील गोगाव येथे अवैध दारूविक्री केली जाते. परिसरातील गावांतील मद्यपी या गावात दारू पिण्यासाठी येतात. यासंदर्भात गडचिरोली पोलिसांना प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी राहुल रायपुरे याच्या घरी धाड टाकून घराची तपासणी केली. दरम्यान, त्याच्याकडे जवळपास १० लिटर मोहफुलाची दारू आढळून आली. संपूर्ण दारू जप्त करीत आरोपीवर गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस हवालदार दुर्गे, पोलीस कर्मचारी परशुराम हलामी व उषा मुंडळा यांनी केली. यावेळी मुक्तिपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवनाथ मेश्राम उपस्थित होते.