१ हजार ४१० रूपये हमी भाव मिळणार धानाला
By Admin | Updated: November 18, 2015 01:43 IST2015-11-18T01:43:08+5:302015-11-18T01:43:08+5:30
आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत साधारण प्रतीच्या धानाला प्रती क्विंटल १ हजार ४१० रूपये व उच्च प्रतीच्या धानाला प्रती क्विंटल १ हजार ४५० रूपये भाव दिला जाणार आहे.

१ हजार ४१० रूपये हमी भाव मिळणार धानाला
धानोरा : आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत साधारण प्रतीच्या धानाला प्रती क्विंटल १ हजार ४१० रूपये व उच्च प्रतीच्या धानाला प्रती क्विंटल १ हजार ४५० रूपये भाव दिला जाणार आहे.
उपप्रादेशिक कार्यालय धानोरा अंतर्गत चार धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. धानोरा, रांगी, कारवाफा व मुरूमगाव या चार ठिकाणी गोदामाची व्यवस्था असल्याने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी धान खरेदी केंद्र सुरू केले आहेत. शेतकऱ्यांनी धान संस्थेच्या खरेदी केंद्रावर आॅनलाईन सातबाऱ्याची प्रत घेऊन यावी. प्रती हेक्टरी २० क्विंटल धानाची खरेदी करण्यात येणार आहे. धान विक्री करतेवेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा खाता क्रमांक संस्था व्यवस्थापकांना देण्यात यावा. धानाची रक्क्म संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये आॅनलाईन सेवेनुसार जमा करण्यात येईल. चुरणे झालेल्या शेतकऱ्यांनी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या धान खरेदी केंद्रावर धान विक्रीस आणावे, असे आवाहन धानोराचे उपप्रादेशिक व्यवस्थापक बी. एल. तरासे यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)