शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात १ ठार; १९ जखमी

By admin | Updated: September 21, 2014 23:50 IST

तालुक्यातील जामगिरी येथील एका कुटुंबातील व्यक्ती आपल्या नातेवाईकांसह मार्र्कंडादेव येथील नदीपात्रात अस्थीविसर्जन करुन परतत असताना चामोर्शी- भेंडाळा मार्गावरील प्लायवूड फॅक्टरीजवळील

चामोर्शी : तालुक्यातील जामगिरी येथील एका कुटुंबातील व्यक्ती आपल्या नातेवाईकांसह मार्र्कंडादेव येथील नदीपात्रात अस्थीविसर्जन करुन परतत असताना चामोर्शी- भेंडाळा मार्गावरील प्लायवूड फॅक्टरीजवळील नाल्याच्या वळणावर वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. दुपारी ३.३० ते ४ वाजताच्या दरम्यान झालेल्या या अपघातात एक जण जागीच ठार तर ८ जण गंभीर व ११ जण किरकोळ जखमी झाले.जामगिरी येथील नागरिक आपल्या नातेवाईकांसह मार्र्कंडादेव येथे अस्थी विसर्जन करुन एम. एच. ३३ जी. १५८० या टाटा झेनान या वाहनाने परत जामगिरीकडे येत होते. दरम्यान काही अंतर पार केल्यानंतर प्लायवूड फॅक्टरीनजीकच्या नाल्याच्या वळणावर चालक मिथुन रामगिरवार रा. चाकलपेठ ता. चामोर्शी यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले व दुर्घटना घडली. या अपघातात राजन्ना रामन्ना चंगावार रा. अड्याळ हे जागीच ठार झाले. तर आठ जण गंभीर जखमी व ११ जण किरकोळ जखमी झाले. गंभीर जखमींमध्ये नंदाबाई कोपुलवार (४०), सीताराम कोपुलवार (६५), शशीकला कोपुलवार (५०), सुनिल कोपुलवार (४५), मनोहर कोपुलवार (३५), वर्षा कोपुलवार (२०), लीलाबाई कोपुलवार (५०), रेखाबाई कोपुलवार (४०) सर्व रा. जामगिरी यांचा समावेश आहे. गंभीर जखमींना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. अपघातात वाहनातील ११ जण किरकोळ जखमी झाले. यामध्ये कवळू कोपुलवार (६०), राजु कोपुलवार (४०), संजय बहिरेवार (४०), प्रशांत कोपुलवार (१४), नीलकंठ भोयर (५०), शांताबाई कोपुलवार (५०), श्रीकांत कोपुलवार (२५), मयुर बुरे (१३), सुशांत कोपुलवार (१६), गीता कोपुलवार (३२), तन्मय साईनाथ कोपुलवार (३) सर्व रा. जामगिरी यांचा समावेश आहे. किरकोळ जखमींना चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. वाहनाच्या अपघातादरम्यान चैताली चांदेकर या चामोर्शीकडे दुचाकीने येत होत्या. दरम्यान अपघाताची माहिती चांदेकर यांनी चामोर्शी येथील जयदुर्गा मंडळाचे सदस्य राहुल नैताम, सुरेंद्र उरकुडे, राकेश खेवले, किरण आकुलवार, सोनल मेश्राम यांना दिली. सदस्यांनी मंडळाची रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळ गाठले व जखमींना चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. आठ गंभीर जखमींना ग्रा. पं. , दुर्गामंडळ व रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेने गडचिरोली येथे दाखल करण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालयात जखमींवर डॉ. नागदेवते, डॉ. देवरी उपचार करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत गंभीर जखमींना गडचिरोली येथे हलविण्याची प्रक्रिया सुरुच होती. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डी. एम. गंधेवार, सहायक फौजदार भास्कर हुर्रे, कोहपरे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)