अपघातात १ ठार; १९ जखमी

By Admin | Updated: September 21, 2014 23:50 IST2014-09-21T23:50:36+5:302014-09-21T23:50:36+5:30

तालुक्यातील जामगिरी येथील एका कुटुंबातील व्यक्ती आपल्या नातेवाईकांसह मार्र्कंडादेव येथील नदीपात्रात अस्थीविसर्जन करुन परतत असताना चामोर्शी- भेंडाळा मार्गावरील प्लायवूड फॅक्टरीजवळील

1 killed in accident; 19 injured | अपघातात १ ठार; १९ जखमी

अपघातात १ ठार; १९ जखमी

चामोर्शी : तालुक्यातील जामगिरी येथील एका कुटुंबातील व्यक्ती आपल्या नातेवाईकांसह मार्र्कंडादेव येथील नदीपात्रात अस्थीविसर्जन करुन परतत असताना चामोर्शी- भेंडाळा मार्गावरील प्लायवूड फॅक्टरीजवळील नाल्याच्या वळणावर वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. दुपारी ३.३० ते ४ वाजताच्या दरम्यान झालेल्या या अपघातात एक जण जागीच ठार तर ८ जण गंभीर व ११ जण किरकोळ जखमी झाले.
जामगिरी येथील नागरिक आपल्या नातेवाईकांसह मार्र्कंडादेव येथे अस्थी विसर्जन करुन एम. एच. ३३ जी. १५८० या टाटा झेनान या वाहनाने परत जामगिरीकडे येत होते. दरम्यान काही अंतर पार केल्यानंतर प्लायवूड फॅक्टरीनजीकच्या नाल्याच्या वळणावर चालक मिथुन रामगिरवार रा. चाकलपेठ ता. चामोर्शी यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले व दुर्घटना घडली. या अपघातात राजन्ना रामन्ना चंगावार रा. अड्याळ हे जागीच ठार झाले. तर आठ जण गंभीर जखमी व ११ जण किरकोळ जखमी झाले. गंभीर जखमींमध्ये नंदाबाई कोपुलवार (४०), सीताराम कोपुलवार (६५), शशीकला कोपुलवार (५०), सुनिल कोपुलवार (४५), मनोहर कोपुलवार (३५), वर्षा कोपुलवार (२०), लीलाबाई कोपुलवार (५०), रेखाबाई कोपुलवार (४०) सर्व रा. जामगिरी यांचा समावेश आहे. गंभीर जखमींना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. अपघातात वाहनातील ११ जण किरकोळ जखमी झाले. यामध्ये कवळू कोपुलवार (६०), राजु कोपुलवार (४०), संजय बहिरेवार (४०), प्रशांत कोपुलवार (१४), नीलकंठ भोयर (५०), शांताबाई कोपुलवार (५०), श्रीकांत कोपुलवार (२५), मयुर बुरे (१३), सुशांत कोपुलवार (१६), गीता कोपुलवार (३२), तन्मय साईनाथ कोपुलवार (३) सर्व रा. जामगिरी यांचा समावेश आहे. किरकोळ जखमींना चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. वाहनाच्या अपघातादरम्यान चैताली चांदेकर या चामोर्शीकडे दुचाकीने येत होत्या. दरम्यान अपघाताची माहिती चांदेकर यांनी चामोर्शी येथील जयदुर्गा मंडळाचे सदस्य राहुल नैताम, सुरेंद्र उरकुडे, राकेश खेवले, किरण आकुलवार, सोनल मेश्राम यांना दिली. सदस्यांनी मंडळाची रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळ गाठले व जखमींना चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. आठ गंभीर जखमींना ग्रा. पं. , दुर्गामंडळ व रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेने गडचिरोली येथे दाखल करण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालयात जखमींवर डॉ. नागदेवते, डॉ. देवरी उपचार करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत गंभीर जखमींना गडचिरोली येथे हलविण्याची प्रक्रिया सुरुच होती. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डी. एम. गंधेवार, सहायक फौजदार भास्कर हुर्रे, कोहपरे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 1 killed in accident; 19 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.