१९१ ज्येष्ठांची चिकित्सा

By Admin | Updated: October 9, 2015 01:56 IST2015-10-09T01:56:04+5:302015-10-09T01:56:04+5:30

उपजिल्हा रुग्णालय तसेच ज्येष्ठ नागरिक कल्याण समिती अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक दिन गुरूवारी घेण्यात आला.

1 9 1 veterinary medicine | १९१ ज्येष्ठांची चिकित्सा

१९१ ज्येष्ठांची चिकित्सा

अहेरीत ज्येष्ठ नागरिक दिन : उपजिल्हा रुग्णालयाचा पुढाकार
अहेरी : उपजिल्हा रुग्णालय तसेच ज्येष्ठ नागरिक कल्याण समिती अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक दिन गुरूवारी घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपजिल्हा रुग्णालयाच्या पुढाकारातून राष्ट्रीय असंसगर्जन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत १९१ ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आला. तसेच यावेळी ३७ जणांची नेत्र चिकित्साही करण्यात आली.
अध्यक्षस्थानी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक संजय मोरे, ज्येष्ठ नागरिक कल्याण समितीचे संस्थापक विनोद भोसले उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ नागरिक शेख, फरीद, नागया गुलेटीवार, देवाजी गेडाम, सय्यद अजीज, उमलाबाई यांचा शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वृद्धापकाळात अपंगत्व आलेल्या मदनाग गन्नमवार, देवाजी गेडाम, सय्यद अजीज, रामप्रसाद गुप्ता यांना वॉकर स्टिकचे वितरण करण्यात आले. तसेच ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या १०० मीटर चालण्याच्या स्पर्धेत प्रथम आलेल्या सर्वेश्वर कारेंगुलवार, दत्तात्रय भोगावार, बॉल रिंग टाकण्याच्या स्पर्धेत सर्वेश्वर कारेंगुलवार, बाबुराव निब्रड तर थ्रो बॉल स्पर्धेतील नारायण कारेंगुलवार, के. एन. इटकमवार, विनोद भोसले यांना भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. रूपेश गावडे यांनी योग, प्राणायाम याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन समुपदेशक जल्लवार, प्रास्ताविक मनीषा कांचनवार तर आभार डॉ. मनीषा मडावी यांनी मानले. स्पर्धेत पंच म्हणून गुरान, संजय उमडवार, अमित झिंगे, महेंद्र बांदुरकर, अनिल मोहुर्ले, योगेश श्रीकोंडावार तर तपासणीसाठी डॉ. कटरे, प्रीती आत्राम, रमा गट्टुरवार, सुमेधा कांबळे, डॉ. श्रीखंडे व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 1 9 1 veterinary medicine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.