शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

एआयएफएफकडून फिफाला अधिकृत माहितीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 2:21 AM

नवी दिल्ली : अ. भा. फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची तिस-यांदा झालेली निवड रद्द ठरविणा-या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाची अधिकृत माहिती एआयएफएफकडून येईपर्यंत आम्ही प्रतिक्रिया देणार नसल्याचे फिफाने म्हटले आहे.फिफाला याप्रकरणी अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. तोपर्यंत आम्ही अधिक काही सांगू शकत नसल्याचे फिफाच्या प्रवक्त्याने बुधवारी सांगितले. हे प्रकरण ...

नवी दिल्ली : अ. भा. फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची तिस-यांदा झालेली निवड रद्द ठरविणा-या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाची अधिकृत माहिती एआयएफएफकडून येईपर्यंत आम्ही प्रतिक्रिया देणार नसल्याचे फिफाने म्हटले आहे.फिफाला याप्रकरणी अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. तोपर्यंत आम्ही अधिक काही सांगू शकत नसल्याचे फिफाच्या प्रवक्त्याने बुधवारी सांगितले. हे प्रकरण महासंघातील गटबाजी अथवा शासकीय हस्तक्षेपाचे नव्हे तर न्यायालयाच्या निकालाचे असल्याने फिफाने सावध भूमिका स्वीकारल्याचे फुटबॉल जाणकारांचे मत आहे.पटेल यांना गेल्या वर्षी सलग तिसºया कार्यकाळासाठी पुढील ४ वर्षे एआयएफएफ अध्यक्ष निवडण्यात आले. याप्रकरणी राष्टÑीय क्रीडासंहितेचे पालन झाले नाही, असे नमूद करून न्यायालयाने निवड रद्द ठरवली.माजी नागरी हवाई वाहतूकमंत्री असलेले पटेल हे २००८मध्ये तत्कालीन अध्यक्ष प्रियरंजन दासमुन्शी आजारी पडताच वर्षभरासाठी काळजीवाहू अध्यक्ष बनले. त्यानंतर आॅक्टोबर २००९ आणि डिसेंबर २०१२ मध्ये दोनदा अध्यक्षपदी विराजमान झाले. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये तिसºयांदा त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांच्या देखरेखीत आगामी पाच महिन्यांत महासंघाची नव्याने निवडणूक होणार असून आयएफएफ न्यायालयाच्या विस्तृत आदेशाची प्रत मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यानंतरच पुढील दिशा निश्चित होईल. (वृत्तसंस्था)फिफाने स्विकारली सावध भूमिकामहासंघातील हे प्रकरण गटबाजी अथवा शासकीय हस्तक्षेपाचे नव्हे तर न्यायालयाच्या निकालाचे असल्याने फिफाने सावध भूमिका स्वीकारल्याचे फुटबॉल जाणकारांचे मत आहे.

टॅग्स :Footballफुटबॉल