Video : मॅच संपताच प्रेक्षकाला मारण्यासाठी स्टार फुटबॉलपटू स्टँडमध्ये धावला, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 14:46 IST2020-03-05T14:46:08+5:302020-03-05T14:46:41+5:30
फुटबॉल लढतीमध्ये मारामारी हा प्रकार काही नवीन नाही.

Video : मॅच संपताच प्रेक्षकाला मारण्यासाठी स्टार फुटबॉलपटू स्टँडमध्ये धावला, अन्...
फुटबॉल लढतीमध्ये मारामारी हा प्रकार काही नवीन नाही. पण, टॉदनम हॉटस्पर आणि नॉर्विच सिटी यांच्यातल्या एफए कप फुटबॉल सामन्यात धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. हॉटस्पर आणि नॉर्विच सिटी यांच्यातला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. पण, 3-2 अशा सरासरीनं नॉर्विच सिटी क्लब जिंकला. या सामन्यानंतर हॉटस्परचा स्टार फुटबॉलपटू एरिक डायर याचा ताबा सुटला आणि तो प्रेक्षकाला मारण्यासाठी थेट स्टँडमध्ये घुसला. त्या प्रेक्षकाने डायरच्या भावाचा अपमान केला होता.
डायरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुरुवातीला डायर स्टँडमध्ये का धावला हे कुणालाच कळलं नाही. पण, त्या प्रेक्षकाजवळ जाताच त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी डायरला आवरले. या कृतीमुळे एफएनं त्याला दंड ठोठावला आहे.
पाहा व्हिडीओ...
Full footage of Eric Dier jumping over the stands and going over to confront a fan who was insulting & abusing his brother. Brotherly love, I respect that. pic.twitter.com/5xeSQ8Vj5a
— FutbolBible (@FutbolBible) March 4, 2020
Heard two stories:
— Dinnage (@dinnagem) March 4, 2020
1: Diers brother in crowd got punched by some dickhead
2: The guy racially abused Gedson Fernandes
Either way enough respect @ericdier
Also the ginger lad in a blue coat giving you a hug is me, x pic.twitter.com/Mo1XM7vlpp