शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प म्हणाले, 'रोनाल्डो राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाही'; पोर्तुगालच्या प्रमुखांनी लगावली 'फ्री किक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2018 11:26 IST

पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रेबेलो दी सॉसा हे दोन दिवसांपूर्वी अमेरिका दौऱ्यावर होते. त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये जाऊन ट्रम्प यांची भेट घेतली....

वॉशिंग्टनः पोर्तुगालचा फुटबॉल स्टार ख्रिस्टियानो रोनाल्डोची जगभरातील 'क्रेझ' आपल्याला ठाऊकच आहे. फिफा वर्ल्ड कप सुरू असताना, त्याच्या नावाची चर्चा झाली नाही तरच नवल. अशीच चर्चा, वॉशिंग्टनमधील 'व्हाईट हाऊस'मध्ये रंगली आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 'ओन गोल' करून बसले.

पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रेबेलो दी सॉसा हे दोन दिवसांपूर्वी अमेरिका दौऱ्यावर होते. त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये जाऊन ट्रम्प यांची भेट घेतली. फुटबॉल फिव्हर असल्याने, विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर, फिफाच्या गप्पा सुरू झाल्या. केंद्रबिंदू होता, अर्थातच ख्रिस्टियानो रोनाल्डो.

पोर्तुगाल जगज्जेतेपदाचा दावेदार असल्याचं सॉसा यांनी ठामपणे सांगितलं. जगातला सर्वोत्तम फुटबॉलपटू पोर्तुगालचा असल्याचंही ते अभिमानानं म्हणाले. रोनाल्डोचं हे गुणगान ऐकून ट्रम्प यांनी सॉसा यांची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला. 'रोनाल्डोनं कधी तुमच्याविरुद्ध पोर्तुगालची निवडणूक लढवली तर?, असा प्रश्न त्यांनी हसत हसत केला. त्यावर सॉसा उत्तर देणार तोच, ट्रम्पच म्हणाले, 'तो जिंकणार नाही. तुम्हालाही माहीत आहे तो जिंकू शकत नाही.' 

आता हा विषय संपला असं ट्रम्प यांना वाटलं. पण, आयती चालून आलेली 'पेनल्टी किक'ची संधी गमावतील ते सॉसा कसले? ते म्हणाले, 'अहो, ते पोर्तुगाल आहे, अमेरिका नाही!' त्यांचा रोख कुणाकडे आहे, हे ट्रम्प यांना बरोब्बर कळलं आणि आपण आपल्याच जाळ्यात अडकल्याची जाणीव ट्रम्पना झाली. 'येस, दॅट्स राइट' एवढंच म्हणत त्यांनीच विषय गुंडाळला.  

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पFootballफुटबॉलSportsक्रीडा