' त्या ' सुपरस्टार फुटबॉलपटूची उडवली होती खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 20:51 IST2018-06-06T20:51:40+5:302018-06-06T20:51:40+5:30
कोट्यावधी लोकं त्याचा खेळ पाहण्यासाठी आसूसलेली असतात. पण एक काळ असा होता, की ' त्या ' महान फुटबॉलपटूची खिल्ली उडवली गेली होती.

' त्या ' सुपरस्टार फुटबॉलपटूची उडवली होती खिल्ली
नवी दिल्ली : आज ' तो ' फुटबॉसपटू यशोशिखरावर पोहोचलेला आहे. अनेकांच्या गळ्यांतील ताईत आहे. कोट्यावधी लोकं त्याचा खेळ पाहण्यासाठी आसूसलेली असतात. पण एक काळ असा होता, की ' त्या ' महान फुटबॉलपटूची खिल्ली उडवली गेली होती.
सप्टेंबर 2000 साली ' तो ' महान खेळाडू 13 वर्षांचा होता. त्यावेळी तो एका फुटबॉल अकादमीमध्ये आपला खेळ दाखवण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याला तू फारच बुटका आहेस, हा बुटका मुलगा कसा खेळाडू होऊ शकतो, असे म्हणत खिल्ली उडवली गेली. पण ' त्या ' 13 वर्षाच्या मुलाने हार मानली नाही. अथक मेहनत करत त्याने एक दिवस आपली दखल विश्वाला घ्यायला लागली. ' तो ' फुटबॉलपटू म्हणजे लिओनेल मेस्सी.
खिल्ली उडवल्यावर मेस्सी खचला नाही. त्याने आपल्या खेळात सुधारणा केली. स्वत:ची एक शस्त्रक्रीया करण्यासाठी मेस्सीकडे पैसे नव्हते. त्यावेळी बार्सिलोना क्लबने त्याची मदत केली. त्यानंतर मेस्सीने नेहमीच बार्सिलोनाला पसंती दिली.