शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

स्पेन, स्वीडनची गोलशून्य बरोबरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 5:39 AM

युरो कप फुटबॉल; स्लोवाकियाचा पोलंडला धक्का 

सेविले : युरो कप फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि स्वीडन या तुल्यबळ संघांमध्ये झालेल्या लढतीत गोलशून्य बरोबरी झाली. दोन्ही संघांनी गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या, मात्र कोणालाही गोल करण्यात यश आले नाही. यामुळे अखेर हा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. दुसरीकडे, स्लोवाकियाने शानदार विजय मिळवताना पोलंडला २-१ असा धक्का दिला.

चेंडूवर अधिक नियंत्रण राखत स्पेनने सामन्यावर वर्चस्व राखले. यामुळे स्वीडनवर काहीसा दबाव बनवण्यात त्यांना यश आले. मात्र, स्वीडनच्या बचावफळीने शानदार कामगिरी करत स्पॅनिश आक्रमण रोखले. त्याच वेळी, स्वीडनलाही स्पॅनिश बचाव भेदण्यात यश आले नाही. स्पेनने चेंडूवर ७५ टक्के नियंत्रण राखताना गोल करण्याचे १७ प्रयत्न केले. यापैकी त्यांनी पाच वेळा गोलजाळ्यावर आक्रमण केले. मात्र त्यांना यश आले नाही. स्वीडननेही स्पेनच्या गोलजाळ्यावर चार वेळा आक्रमण केले, पण एकही आक्रमण यशस्वी ठरले नाही.

स्पेन संघ युरो चषक स्पर्धेतील गेल्या १४ साखळी सामन्यांत केवळ एकदाच गोल करण्यात अपयशी ठरला आहे. त्याचवेळी, स्वीडनने गेल्या १७ आंतरराष्ट्रीय लढतींमध्येही एकही सामना अनिर्णीत राखला नव्हता.

स्लोवाकियाचा शानदार विजयसेंट पीटर्सबर्ग : आक्रमण आणि बचावाचे शानदार ताळमेळ साधलेल्या स्लोवाकियाने युरो चषक फुटबॉल स्पर्धेत पोलंडला २-१ नमवले. बचावपटू मिलान क्रिनियार याने संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने रॉबर्ट लेवांडोवस्की याला गोल करण्याापासून रोखल्यानंतर निर्णायक गोल करत स्लोवाकियाला विजयी केले. १८व्याच मिनिटालाच वोजसिएच स्केझेन्सी याच्याकडून स्वयंगोल झाल्याने स्लोवाकियाला आघाडी मिळाली. ६२व्या मिनिटाला पोलंडकडून क्रीशोवियाक याने गोल करत सामना बरोबरीत आणला. मात्र, मिलानने ६९व्या मिनिटाला शानदार गोल करत स्लोवाकियाला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी अखेरपर्यंत टिकवत स्लोवाकियाने दमदार बाजी मारली.