शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

“आयएसएल ही फिफा वर्ल्ड कप खेळण्याचा आमचा विश्वास प्रज्वलित करणारी ठिणगी आहे”- संदेश झिंगन  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2024 7:25 PM

चंदीगडमध्ये वाढलेल्या संदेशने लीगमधील प्रभावी खेळामुळे २०१५ मध्ये वरिष्ठ राष्ट्रीय संघात पदार्पण केले.

इंडियन सुपर लीगच्या इकोसिस्टममधून तयार झालेला कदाचित पहिला व मोठा खेळाडू म्हणून संदेश झिंगन याचे नाव घेतल्यास चुकीचे ठरणार नाही. मागील १० वर्षांत त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश मिळवले आहे. त्याने दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन अर्थात SAFF अजिंक्यपद २०२३ स्पर्धा जिंकली, दोनदा इंटरकॉन्टिनेंटल चषक ( २०१८, २०२३ ) उंचावला आणि २०१७ व २०२३ अशी दोन वेळा तिरंगी मालिका जिंकली.

चंदीगडमध्ये वाढलेल्या संदेशने लीगमधील प्रभावी खेळामुळे २०१५ मध्ये वरिष्ठ राष्ट्रीय संघात पदार्पण केले. ब्लू टायगर्सच्या प्रसिद्ध ‘व्हायकिंग क्लॅप’मध्ये अग्रभागी असण्यापासून ते पाठीमागे प्रामाणिक लिडर होण्यापर्यंत, प्रत्येकजण अडचणीच्या क्षणी त्याच्याकडे पाहिले जाते. अर्जुन पुरस्कार विजेत्या झिंगनला खात्री आहे की, भारत पुढील फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत खेळेल आणि त्या ऐतिहासिक घटनेचा पहिला अध्याय आयएसएलला समर्पित केला जाईल, कारण देशात आयएसएलने फुटबॉलमध्ये उच्चस्तरीय क्रांती घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे,  हे तो आवर्जून सांगतो.

“आयएसएल खूप महत्त्वाचे आहे. या देशातील प्रत्येक नागरिकाचा यात सहभाग असेल आणि १५-२० 0 वर्षात भारत या खेळात आम्हाला हवा तिथे असेल, तेव्हा आयएसएल लक्षात राहील. जागतिक क्रमवारीत १७३व्या स्थानावर असताना कोणीही आमच्यावर विश्वास ठेवला नाही, लोक विचारायचे की भारताचा फुटबॉल संघ आहे का? त्या वेळी आम्ही फुटबॉलला पाठिंबा देत होतो आणि आता लोक आमची दखल घेत आहेत,” असे झिंगनने ‘In The Stands’च्या एका भागामध्ये बोलताना सांगितले.

“आयएसएलने राष्ट्रीय संघाच्या अलीकडच्या कामगिरीमध्ये जी भूमिका बजावली आहे ती, मी शब्दात मांडू शकत नाही. ती प्रचंड आहे. आयएसएलचा प्रभाव मोठा आहे. शब्दात सांगायचे तर ते आपल्या देशातील फुटबॉलच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, जेव्हा आम्ही FIFA वर्ल्ड कप स्पर्धेत नियमित खेळू तेव्हा लोकांनी असे म्हटले पाहिजे आणि म्हणतील की आयएसएलही ही  विश्वास प्रज्वलित करणाऱ्या ठिणग्यांपैकी एक होती. लोक ही लीग लक्षात ठेवतील,” असेही तो म्हणाला.

रोल मॉडेल तयार करण्याबद्दल आयएसएलमुळे स्थानिक खेळाडूंना एक प्रेरणा मिळाली आणि त्यांनी तरुणांना व्यावसायिकपणे फुटबॉल खेळण्यास प्रोत्साहित केले आहे, असे झिंगनला वाटते. झिंगनचा असा विश्वास आहे की, भारतातील संपूर्ण पिढी युरोपियन खेळाडूंना आदर्श मानून मोठी झाली आहे, कारण देशात स्वदेशी नायकांची कमतरता आहे. पण, आयएसएलमुळे हे चित्र बदलले आणि चंदीगडमधील तरुण आता त्याच्याकडे प्रेरणा म्हणून पाहतात आणि त्याच धर्तीवर त्यांचा स्वत:चा प्रवास रेखाटण्याचा प्रयत्न करत आहेत.  

“तुम्हाला स्थानिक नायकांची गरज आहे. भाईचुंग भुतिया सर, सुनील छेत्री भाई, रेनेडी सिंग भाई हे मी लहान असताना माझे स्थानिक नायक होते. कारण, मी फुटबॉलमध्ये खूप गुंतलो होतो. माझ्या अनेक मित्रांना यांच्याबद्दल काहीही माहित नव्हते. पण, मँचेस्टर युनायटेड, एफसी बार्सिलोना यांच्यासाठी कोण खेळतो हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे जेव्हा तुमच्याकडे स्थानिक नायक असतील तेव्हा तुम्ही त्यांच्याशी अधिक कनेक्ट होऊ शकता. चंदीगड मधील पुढची पिढी ही माझ्यासारखीच आहे, जिथून मी आलो तेथून तेही आले आहेत. म्हणून जेव्हा तुम्ही स्थानिक नायकांशी संपर्क साधता आणि तेही सामान्य माणसं आहेत हे लक्षात येते, तेव्हा ते तुम्हाला प्रेरणा देतात. मेहनत घेतल्यास तुम्ही त्या नायकांमध्ये असू शकता याची अधिक वास्तववादी कल्पना त्यांना देते,” असेही झिंगन याने स्पष्ट केले.

एफसी गोवात दाखल झाल्याबद्दल  

झिंगन हळुहळू आयएसएलमधील सर्वात प्रमुख चेहरा बनला आहे. तो कदाचित ISL इकोसिस्टममधून तयार झालेला पहिला मोठा खेळाडू होता. २०१४ मध्ये झिंगन हा ISL इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर पुरस्काराचा मानकरी होता. त्याने लीगमध्ये केरला ब्लास्टर्स एफसी, मोहन बागान सुपर जायंट आणि बंगळुरू एफसीचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने एफसी गोवाच्या ताफ्यात दाखल होऊन एक नवीन अध्याय सुरू केला आहे. त्याचा या प्रवासाची सुरुवात काही खास झाली नसली तरी तो पुनरागमनासाठी सज्ज आहे. २०१४ मध्ये ब्रेकआउट २० वर्षीय स्टार म्हणून सुरुवात केल्यापासून ते १० वर्षांनंतर एक कौटुंबिक माणूस बनण्यापर्यंत, झिंगनच्या जीवनाचे वर्तुळ पूर्ण झाले आहे आणि त्यात आयएसएलची प्रमुख भूमिका आहे. मुळात त्याचे एफसी गोवा संघात जाणे हे इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा कौटुंबिक घटकांमुळे प्रेरित होते.

“माझ्या एफसी गोवामध्ये जाण्यामागे मानोलो यांचा मोठा प्रभाव होता. खरे सांगायचे तर माझ्या कुटुंबामुळे, माझ्या मुलीमुळेही मी एफसी गोवामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मी अविवाहित होतो तेव्हा माझा दृष्टिकोन वेगळा होता. जेव्हा तुम्ही लग्न करता तेव्हा तुमचा दृष्टिकोन वेगळा असतो. जेव्हा तुम्ही वडील बनता, तेव्हा तुम्ही स्वतःचा विचार करणारी शेवटची व्यक्ती बनता.  मला असे वाटले की तिच्या वाढीसाठी ही एक चांगली जागा आहे,” असे झिंगनने लीगशी संवाद साधताना सांगितले. गोव्याच्या विचित्र आणि निसर्गरम्य राज्यात मुलीने लहानाचे मोठे व्हावे अशी इच्छा त्याने व्यक्त केली. ट्रॉफी उंचावण्याचा निर्धार

१० वर्षांमध्ये त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड यश पाहिले आहे. २०२३ मध्ये दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन (SAFF) चॅम्पियनशिप जिंकली आहे. दोनवेळा इंटरकॉन्टिनेंटल चषक ( २०१८, २०२३) जिंकला आहे. दोन वेळा ( २०१७, २०२३) तिरंगी मालिकाही जिंकली आहे. पण, आयएसएल ट्रॉफी त्याच्यापासून दूर आहे, त्याला चार वेळा ( २०१४, २०१६, २०२०-२१, २०२२-२३) उपविजेतेपदावर समाधानी रहावे लागले आहे. या मोसमात एफसी गोवासोबत हा दुष्काळ संपवता येईल असा त्याला विश्वास आहे का, असे विचारले असता, तो म्हणाला, “माझ्यामध्ये कधीही आत्मविश्वासाची कमतरता नाही.” जेतेपद पटकावण्याच्या दृष्टीने संघाने चमकदार सुरुवात केली आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

एफसी गोवाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) च्या १०व्या हंगामाची उत्कृष्ट सुरुवात केली आहे. या पर्वाच्या पहिल्या टप्प्यात हा संघ अपराजित राहिला आहे. मानोलो मार्क्युझ यांची नियुक्ती आणि त्यांच्या नवीन अधिग्रहणामुळे एफसी गोवासाठी गोष्टी वेगाने बदलल्या आहेत आणि त्यात बचावपटू संदेश झिंगनची भूमिका अनुकरणीय आहे. भारतीय आंतरराष्‍ट्रीय खेळाडूने ISL 2023-24 च्‍या प्रत्येक मिनिटाला खेळ करून एफसी गोवाला १० सामन्यांमध्‍ये ६ क्‍लीन शीट ठेवण्‍यात मदत केली आहे. त्याने ७९% च्या उत्तीर्ण अचूकतेसह प्रति गेम ५.६ क्लिअरन्स नोंदवले आहेत. झिंगनने एक गोल केला आहे आणि ओडेई ओनाइंडियासोबतच्या त्याच्या बचावात्मक भागीदारीमुळे त्याच्या संघाने लीगमध्ये आतापर्यंत सर्वात कमी (५) गोल स्वीकारले आहेत.

टॅग्स :Footballफुटबॉलgoaगोवा