रोनाल्डो.. हाजीर हो...!करचोरी प्रकरणी न्यायालयाचे समन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:06 IST2017-08-01T01:05:58+5:302017-08-01T01:06:04+5:30

पोर्तुगालचा सुपरस्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याला लाखो युरोची करचोरी केल्याप्रकरणी माद्रीदजवळच्या एका न्यायालयात हजर राहावे लागेल.

Ronaldo .. Hazare Ho ...! Court summons in tax case | रोनाल्डो.. हाजीर हो...!करचोरी प्रकरणी न्यायालयाचे समन्स

रोनाल्डो.. हाजीर हो...!करचोरी प्रकरणी न्यायालयाचे समन्स

माद्रिद : पोर्तुगालचा सुपरस्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याला लाखो युरोची करचोरी केल्याप्रकरणी माद्रीदजवळच्या एका न्यायालयात हजर राहावे लागेल.
३२ वर्षीय पोर्तुगाली स्ट्रायकरची पोजुएलो डी अलारकोन या शहरातील एका न्यायालयात चौकशी केली जाईल. आपली मैत्रीण आणि कुटुंबीयांसोबत उन्हाळी सुट्टीवरून परत आलेला रोनाल्डोचे वास्तव्य सध्या याच शहरात आहे. रोनाल्डोवर एक करोड ७३ लाख डॉलर्स इतक्या रकमेचा कर बुडविल्याचा आरोप आहे. त्याने या आरोपाचा इन्कार केला आहे. त्याची व्यावसायिक व्यवस्थापन एजन्सी गेस्टिफ्यूटने सांगितले की, रोनाल्डोचा व्यवहार पारदर्शी आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Ronaldo .. Hazare Ho ...! Court summons in tax case