शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

रोनाल्डोने पूर्ण केले ‘शतक’, चॅम्पियन्स लीग स्पर्धेत नोंदवला 100 वा वैयक्तिक गोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 1:17 AM

स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने केलेल्या दोन गोलच्या जोरावर बलाढ्य रियाल माद्रिद संघाने पॅरिस सेंट जर्मेनचा (पीएसजी) ३-१ असा पराभव केला. या शानदार विजयासह रेयाल माद्रिदने चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या सत्रात विजयी आगेकूच केली.

माद्रिद : स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने केलेल्या दोन गोलच्या जोरावर बलाढ्य रियाल माद्रिद संघाने पॅरिस सेंट जर्मेनचा (पीएसजी) ३-१ असा पराभव केला. या शानदार विजयासह रेयाल माद्रिदने चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या सत्रात विजयी आगेकूच केली. विशेष म्हणजे यासह रोनाल्डोने चॅम्पियन्स लीग स्पर्धेत आपला शंभरावा गोल नोंदवला.माद्रिदने सुरुवातीला सावध भूमिका घेतल्यानंतर मोक्याच्यावेळी वेगवान खेळ केली. फुटबॉलचाहत्यांचे लक्ष रोनाल्डोसह पीएसजी संघाकडून खेळणाºया स्टार नेमारच्या कामगिरीकडेही लागले होते. मात्र, रोनाल्डो मॅजिकपुढे नेमारचा जलवा प्रभावी ठरला नाही. पीएसजी संघाकडून झालेला सामन्यातील एकमेव गोल अ‍ॅड्रियन रेबियोट्स याने नोंदवला. या गोलमध्ये सूत्रधाराची भूमिका निभावताना नेमारने मोलाचे योगदान दिले. मात्र, माद्रिदचा धडाका रोखण्यात पीएसजी अपयशी ठरले.आता हे दोन्ही संघ ६ मार्चला एकमेकांविरुद्ध परतीचा सामना खेळतील. या सामन्यात नेमारवर आपल्या संघाला विजयी करण्यासाठी मोठी जबाबदारी असेल. ‘आमच्या खेळाडूंनी या सामन्यात चांगली कामगिरी केली असून विजयी लय कायम राखण्यासाठी आम्हाला याच प्रकारच्या प्रदर्शनाची आवश्यकता होती,’ अशी प्रतिक्रीया रियाल माद्रिदचा कर्णधार सर्जियो रामोस याने दिली.2016 रियाल माद्रिदने ला लीगा आणि चॅम्पियन्स लीग स्पर्धेवर कब्जा केला होता. 2017 चे वर्ष रोनाल्डोसाठी स्वप्नवत होते. गतवर्षीच त्याने अर्जेंटिनाचा स्टार आणि दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सीला मागे टाकत फीफाचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू पुरस्कार उंचावला होता. ३२ वर्षीय रोनाल्डोने पाचवेळा हा पुरस्कार मिळवला आहे.

टॅग्स :Footballफुटबॉल