शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

रोनाल्डो व मार्टिन्स सर्वोत्तम फुटबॉलपटू, फिफाच्या वार्षिक पुरस्कारांमध्ये सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 07:02 IST

लंडन- पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि नेदरलँडस्ची लिके मार्टिन्स हे यंदाचे सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू ठरले.

लंडन- पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि नेदरलँडस्ची लिके मार्टिन्स हे यंदाचे सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू ठरले. जागतिक फुटबॉल नियंत्रण संस्था 'फिफा'च्या 2017 च्या वार्षिक पुरस्कारांमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लंडनच्या पेलाडियम थिएटर येथे सोमवारी रात्री हा शानदार सोहळा पार पडला. त्यात जगभरातील नावाजलेल्या फुटबॉलपटूंसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना गोल्डन बॉलने सन्मानित करण्यात आले. 

रोनाल्डोने आपल्या पुरस्काराबद्दल जगभरातील आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत तर मार्टिन्स हिने आपल्या आईवडिलांना विशेष धन्यवाद दिले आहेत. प्रतिभेला मेहानतीची जोड दिली तरच यश मिळते असे ख्रिस्तियानो रोनाल्डोने या समारंभात सांगितले. त्याने सलग तिसऱ्या वर्षी आणि एकूण सहाव्यांदा हा मानाचा पुरस्कार जिंकला आहे. यासह मेस्सीचा पाचवेळा हा पुरस्कार जिंकण्याचा विक्रम त्याने मोडला.

सर्वोत्कृष्ट गोल आणि सर्वोत्तम महिला खेळाडू अशा दोन पुरस्कारांसाठी नॉमिनेशन मिळालेली व्हेनेझुएलाच्या अवघ्या 18 वर्षाच्या डेना कसेलेनोस हिला एकही पुरस्कार मिळाला नाही. याच समारंभात फिफाच्या सर्वोत्तम जागतिक संघाची (बेस्ट वर्ल्ड इलेव्हन) संघाची घोषणा करण्यात आली. त्यात ख्रिस्तियानो रोनाल्डो व जियानलुकी ब्युफॉन या विजेत्यांसह मेस्सी व नेमार यांचाही समावेश आहे. 

फिफाचा वर्ल्ड इलेव्हन संघ असा-जियानलुकी ब्युफान (गोलकीपर), डॕनी आल्वेस, मार्सेलो , सर्जीयो रामोस, लिओनादो बानुस्ची, लुका मोड्रीक, टोनी क्रुस,  आंद्रियास इनियेस्टा,  लियोनेल मेस्सी, नेमार आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो

पुरस्कार विजेते...सर्वोत्तम गोलरक्षक- जियानल्युकी ब्युफॉनसर्वोत्तम गोल- अॉलिव्हर जिरुडसर्वोत्तम प्रशिक्षक (पुरुष) - झिनेदिन झिदान(रियाल माद्रिद) सर्वोत्तम प्रशिक्षक (महिला)- सरिना विगमन(नेदरलँड)सर्वोत्तम चाहते- सेल्टिक एफ सीखेळाडूवृत्ती पुरस्कार- फ्रान्सिस कोनेसर्वोत्तम महिला खेळाडू- लुकी मार्टिन्स (नेदरलँड) सर्वोत्तम पुरुष खेळाडू- ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल)

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017