Breaking : ख्रिस्तियानो रोनाल्डो कोरोना पॉझिटिव्ह, पोर्तुगाल फुटबॉल महासंघाची माहिती 

By स्वदेश घाणेकर | Updated: October 13, 2020 19:57 IST2020-10-13T19:51:26+5:302020-10-13T19:57:28+5:30

रोनाल्डोनं पोर्तुगाल कडून १६७ सामन्यांत सर्वाधिक १०१ गोल केले आहेत.

OFFICIAL: Portugal have confirmed Cristiano Ronaldo has tested positive for COVID-19 | Breaking : ख्रिस्तियानो रोनाल्डो कोरोना पॉझिटिव्ह, पोर्तुगाल फुटबॉल महासंघाची माहिती 

Breaking : ख्रिस्तियानो रोनाल्डो कोरोना पॉझिटिव्ह, पोर्तुगाल फुटबॉल महासंघाची माहिती 

जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूख्रिस्तियानो रोनाल्डो याला कोरोना झाल्याची माहिती पोर्तुगालफुटबॉल महासंघानं दिली आहे. रोनाल्डोनं पोर्तुगाल कडून १६७ सामन्यांत सर्वाधिक १०१ गोल केले आहेत. रविवारी पोर्तुगाल आणि फ्रान्स यांच्यात UEFA नेशन लीग्सचा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला होता. त्यात रोनाल्डोच्या संपर्कात फ्रान्सचे अनेक खेळाडू आले होते. त्यामुळे आता अन्य खेळाडूंचं टेंशन वाढलं आहे.

कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रोनाल्डो आयसोलेट झाला आहे. रोनाल्डोची प्रकृती ठणठणीत असून त्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. पोर्तुगाल संघातील अन्य खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आले आहेत. 

 

Web Title: OFFICIAL: Portugal have confirmed Cristiano Ronaldo has tested positive for COVID-19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.