चक्क १६ लाख रुपयांची ‘टिप’!, रोनाल्डोने दिलेल्या रकमेने वेटर चकित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 04:07 IST2018-07-21T04:07:28+5:302018-07-21T04:07:40+5:30

ग्रीक येथे निवांत वेळ घालविण्यासाठी गेलेल्या फुटबॉल स्टार ख्र्रिस्तियानो रोनाल्डोने दिलेल्या टिपच्या भल्यामोठ्या आकड्यावर हॉटेल कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.

A note worth 16 lakh rupees! | चक्क १६ लाख रुपयांची ‘टिप’!, रोनाल्डोने दिलेल्या रकमेने वेटर चकित

चक्क १६ लाख रुपयांची ‘टिप’!, रोनाल्डोने दिलेल्या रकमेने वेटर चकित

युव्हेंट्स : ग्रीक येथे निवांत वेळ घालविण्यासाठी गेलेल्या फुटबॉल स्टार ख्र्रिस्तियानो रोनाल्डोने दिलेल्या टिपच्या भल्यामोठ्या आकड्यावर हॉटेल कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. पोर्तुगाल संघाला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत बाद फेरीत गाशा गुंडाळावा लागला. त्यानंतर पोर्तुगाल संघाचा हा कर्णधार परिवारासह सुट्टीसाठी ग्रीकमध्ये गेला. येथे राहत असलेल्या हॉटेलमधील कर्मचाºयांच्या सेवेवर खूश होत रोनाल्डोने चक्क १७,८५० पौंड (सुमारे १६ लाख रुपये) टिप दिली. महत्त्वाचे म्हणजे आठवड्याला ५ लाख पौंड पगार कमावणाºया रोनाल्डोसाठी हा आकडा मोठा नाही.
उरूग्वेकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर पोर्तुगालचा कर्णधार रोनाल्डो गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रीगेज, मुलगा ख्रिस्तियानो ज्युनियर आणि मित्रांसह ग्रीकमध्ये दाखल झाला. त्याने या सर्वांसोबत डिनर करत असलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. तेथूनच तो युव्हेंट्स क्लबसोबत करार करण्यासाठी इटलीला गेला. हॉटेल सोडण्यापूर्वी त्याने सर्व कर्मचाºयांना खूश केले. कर्मचाºयांच्या कामावर रोनाल्डो भलताच खूश झाला होता व त्याने पाच आकड्यांची भलीमोठी टिप त्यांना आपसात वाटून घेण्यास सांगितली.

Web Title: A note worth 16 lakh rupees!