शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

FIFA U-17 World Cup : नवी मुंबईत गोल बरसले, भर पावसातही फुटबॉलप्रेमींचा उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 03:34 IST

भर पावसामध्ये झालेल्या १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या सलामी सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध तुर्की लढत १-१ अशी बरोबरीत राहिली.

रोहित नाईकनवी मुंबई : १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेच्या सलामीच्या लढतीआधी पावसाने हजेरी लावल्यानंतर गोलचा वर्षाव झाला. बलाढ्य पॅराग्वेने मालीविरुध्द ३-२ असा रोमांचक विजय मिळवत शानदार विजयी सलामी दिली. दोन्ही संघांनी केलेल्या आक्रमक खेळामुळे फुटबॉलप्रेमींना जल्लोष करण्याची संधी मिळाली.

नेरुळ येथील डॉ. डीवाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर प्रेक्षकांचा हिरमोड झाला. परंतु, पॅराग्वे आणि माली यांनी धडाकेबाज खेळ करत फुटबॉलप्रेमींचे चांगलेच मनोरंजन केले. पहिल्या ३५ मिनिटांमध्येच चार गोल झाल्याने प्रेक्षकांनी स्टेडियम डोक्यावर घेतले. पॅराग्वेने तुफान सुरुवात करताना पहिल्या १७ मिनिटांमध्ये २-० अशी आघाडी घेतली. अँटोनिओ गालेआनो याने १२व्या मिनिटाला, तर लिओनार्डो सांचेझ याने १७व्या मिनिटाला गोल केला. यानंतर मालीनेही जोरदार प्रत्युत्तर दिले. हाद्जी डेÑम याने २०व्या मिनिटाला मालीकडून पहिला गोल केल्यानंतर ३४व्या मिनिटाला लस्साना एनडिये याने शानदार वेगवाग गोल करत मालीला २-२ अशी बरोबरी साधून दिली.

मध्यंतराला बरोबरी कायम राहिल्यानंतर दुसºया सत्रात ५५व्या मिनिटाला पॅराग्वेला पेनल्टी किक मिळाली. ही संधी अचूकपणे साधत अ‍ॅलेन रॉड्रिग्जने पॅराग्वेला ३-२ अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी अखेरपर्यंत कायम राखत पॅराग्वेने स्पर्धेत विजयी सलामी दिली.

तत्पूर्वी झालेल्या सामन्यात न्यूझीलंड व तुर्की यांनी १-१ अशी बरोबरी साधली. पहिल्या सत्रात आक्रमक खेळ केलेल्या तुर्कीने आघाडी घेतल्यानंतर दुसºया सत्रात न्यूझीलंडने पुनरागमन करताना सामना बरोबरी राखला. तुर्कीने आक्रमक सुरुवात करताना आपला इरादा स्पष्ट केला. १८व्या मिनिटाला अहमद कुतुचु याने उजव्या बाजूने आलेल्या पासवर उत्कृष्ट हेडर करुन तुर्कीला आघाडीवर नेले . न्यूझीलंडने दुसºया सत्रात जोरदार प्रत्युत्तर दिले. ५८ व्या मिनिटाला कर्णधार मॅक्स माटा याने तुर्कीच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारत अप्रतिम गोल करत न्यूझीलंडला १-१ अशी बरोबरी साधून दिली.पावसाची दमदार सलामीसामना सुरु होण्याआधी जोरदार वाºयांसह पावसानेही हजेरी लावल्याने डीवाय पाटील स्टेडियमवर फुटबॉलप्रेमींची तारांबळ उडाली. वीज गडगडाटांसह पाऊस कोसळू लागल्याने स्पर्धा आयोजकांवरही काहीसे दडपण आले. त्याचबरोबर जोरदार वाहणा-या वा-यांमुळे मैदानावरील खेळाडूंचे डगआऊट दोनदा कोसळले. त्यामुळे स्वयंसेवकांना अधिक कसरत करावी लागली. दरम्यान, काहीवेळाने पावसाचा जोर ओसरल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि न्यूझीलंड विरुद्ध तुर्की सामना निर्धारीत वेळेत सुरु झाला.मैदानात घुसला कुत्रा...सामन्यातील ६२व्या मिनिटाच्या सुमारासह एक भटका कुत्रा अचानकपणे मैदानात घुसला. यावेळी, त्याने संपुर्ण मैदानाला चक्कर मारल्याने खेळ काहीवेळ थांबविण्यात आला. या श्वानाला नियंत्रणात आणण्यासाठी स्पर्धा स्वयंसेवकांनी मोठी फिल्डिंग लावली. मात्र, सर्वांनाच चकवा देऊन त्या कुत्र्याने मैदान सहजासहजी सोडले नाही. अखेरीस, सर्व बाजूंनी स्वयंसेवकांनी कोंडी केल्यानंतर कुत्र्याने मैदानाबाहेरचा रस्ता पकडला आणि सामना पुन्हा सुरु झाला.

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017FootballफुटबॉलSportsक्रीडाNavi Mumbaiनवी मुंबई