नवी दिल्ली - भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेनटाईन पुढील महिन्यात चीनविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मैत्री लढतीबाबत उत्साहित आहेत. मजबूत संघाविरुद्ध खेळल्या जाणाºया लढतीमुळे पुढील वर्षी होणाºया आशियाई कपच्या तयारीसाठी मदत मिळेल, असे त्यांचे मत आहे. भारतीय संघ १३ आॅक्टोबर रोजी चीनसोबत एक आंतरराष्ट्रीय मैत्री सामना खेळणार आहे. ही लढत जियांग्सू प्रांतामध्ये सुजोऊ सिटीच्या सुजोऊ आॅलिम्पिक स्पोर्ट््स सेंटर स्टेडियममध्ये होणार आहे. कॉन्स्टेनटाईन म्हणाले,‘चीनचा संघ मजबूत असून, आपल्या संघाची त्यांच्याविरुद्ध परीक्षा राहील. सध्याच्या घडीला आपल्याला अशाप्रकारचे सामने खेळणे आवश्यक आहे.’(वृत्तसंस्था)
चीनसारख्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळणे आवश्यक - स्टीफन कॉन्स्टेनटाईन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 02:13 IST