मेक्सिको-स्वीडन लढत मध्यंतरापर्यंत गोलशून्य बरोबरीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:28 IST2018-06-27T20:27:24+5:302018-06-27T20:28:13+5:30
फिफा विश्वचषक स्पर्धेतील एफ गटात मेक्सिको आणि स्वीडन यांच्यातील लढत मध्यंतरापर्यंत गोलशून्य बरोबरीत आहेत.

मेक्सिको-स्वीडन लढत मध्यंतरापर्यंत गोलशून्य बरोबरीत
मॉस्को - फिफा विश्वचषक स्पर्धेतील एफ गटात मेक्सिको आणि स्वीडन यांच्यातील लढत मध्यंतरापर्यंत गोलशून्य बरोबरीत आहेत. दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध अनेक आक्रमणे केली. मात्र खेळाच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघाना गोक करण्यात अपयश आले.
खेळाच्या सुरुवातीलाच स्विडनला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या. मात्र त्यांना गोल करता आला नाही. दुसरीकडे गटात अव्वल असलेल्या मेक्सिकोच्या संघालाही आघाडी मिळवण्यात अपयश आले. दरम्यान 31 व्या मिनिटाला स्विडनच्या खेळाडूंनी केलेले आक्रमण मेक्सिकोचा गोलरक्षक ओचोआ याने थोपवले. अखेर मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत राहिले.