मेस्सीचे शतक, चॅम्पियन्स लीगमध्ये शंभर गोल पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:23 IST2018-03-16T01:23:41+5:302018-03-16T01:23:41+5:30

दिग्गज फुटबॉलर लियोनेल मेस्सी याने येथे चॅम्पियन्स लीगमध्ये आपले शंभर गोल पूर्ण केले. त्यासोबतच बार्सिलोनाने चेल्सीला पराभूत केले. बार्सिलोनाच्या 3-0 अशा विजयाने चेल्सीच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहचण्याच्या आशा संपल्या आहेत.

Messi's century, complete one hundred goals in the Champions League | मेस्सीचे शतक, चॅम्पियन्स लीगमध्ये शंभर गोल पूर्ण

मेस्सीचे शतक, चॅम्पियन्स लीगमध्ये शंभर गोल पूर्ण


बार्सिलोना : दिग्गज फुटबॉलर लियोनेल मेस्सी याने येथे चॅम्पियन्स लीगमध्ये आपले शंभर गोल पूर्ण केले. त्यासोबतच बार्सिलोनाने चेल्सीला पराभूत केले. बार्सिलोनाच्या 3-0 अशा विजयाने चेल्सीच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहचण्याच्या आशा संपल्या आहेत. मेस्सी युरोपातील या महत्त्वाच्या स्पर्धेत गोलचे शतक करणारा दुसरा खेळाडू आहे. या आधी रियाल माद्रिदचा स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो याने ही कामगिरी केली होती. त्याच्या नावावर १५२ सामन्यात ११७ गोल आहेत.यामुळे बार्सिलोनाने दुसऱ्या फेरीत ३-० आणि एकूण ४-१ असा विजय मिळवला.
कॅम्प नाऊमध्ये बार्सिलोनाच्या चाहत्यांना मेस्सीकडून मोठ्या आशा होत्या. त्याने चाहत्यांना निराश केले नाही. मेस्सीने १२९ व्या सेकंदालाच गोल करत प्रेक्षकांना आनंद साजरा करण्याची संधी दिली. तोपर्यंत चेल्सीचा संघ पासदेखील बनवू शकला नव्हता.मेस्सीने ओसमाने डेम्बेलेला गोल करण्यात मदत केली. त्यामुळे बार्सिलोनाची आघाडी दुप्पट झाली. अर्जेंटिनाच्या स्टार फुटबॉलरने यानंतर आणखी एक गोल केला. हा गोल त्याचा चॅम्पियन्स लीगमधील शंभरावा गोल होता. १२३ सामन्यात त्याने ही कामगिरी केली.

Web Title: Messi's century, complete one hundred goals in the Champions League