मेस्सीची हॅट्ट्रिक, गोल्डन बूट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 03:42 AM2019-05-26T03:42:28+5:302019-05-26T03:42:51+5:30

पॅरिस सेंट जर्मनच्या अंतिम लिग सामन्यात किलियन एम्बापे याला चार गोल करण्यात अपयश आल्याने लियोनल मेस्सी हा सलग तिसऱ्यांदा युरोपचा गोल्डन बूट पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू ठरला.

Messi hatrick, golden boot | मेस्सीची हॅट्ट्रिक, गोल्डन बूट

मेस्सीची हॅट्ट्रिक, गोल्डन बूट

Next

बार्सिलोना : पॅरिस सेंट जर्मनच्या अंतिम लिग सामन्यात किलियन एम्बापे याला चार गोल करण्यात अपयश आल्याने लियोनल मेस्सी हा सलग तिसऱ्यांदा युरोपचा गोल्डन बूट पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू ठरला. मेस्सीचा हा एकूण सहावा गोल्डन बूट पुरस्कार आहे. मेस्सीने युरोपियन लिगमध्ये सर्वाधिक ३६ गोल केले. त्याने बार्सिलोनाकडून खेळताना सहाव्यांदा अशी कामगिरी केली.
>एम्बापे याने ३३ गोल केले होते. त्याला मेस्सीला मागे टाकण्यासाठी चार गोलची आवश्यकता होती. मात्र स्टेड डे रेम्स विरोधात त्याला एकमेव गोल करता आला.
>माझ्यासाठी वैयक्तिक पुरस्कार जास्त महत्त्वाचे नाहीत. चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत लिव्हरपूल विरुद्ध ज्या सामन्यात जे घडले त्याचाच विचार अद्याप करत आहे.
- लियोनल मेस्सी

Web Title: Messi hatrick, golden boot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.