Fifa World Cup 2018 : सामन्याच्या मध्यांतराला मॅराडोना यांची प्रकृती बिघडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 18:19 IST2018-06-27T18:17:54+5:302018-06-27T18:19:59+5:30
दिएगो मॅराडोना यांच्या चाहत्यांची चिंता वाढवणारा प्रसंग अर्जेंटिना आणि नायजेरिया यांच्यातील लढती दरम्यान घडला.

Fifa World Cup 2018 : सामन्याच्या मध्यांतराला मॅराडोना यांची प्रकृती बिघडली
सेंट पिटर्सबर्ग- दिएगो मॅराडोना यांच्या चाहत्यांची चिंता वाढवणारा प्रसंग अर्जेंटिना आणि नायजेरिया यांच्यातील लढती दरम्यान घडला. अर्जेंटिना संघासाठी फिफा विश्वचषक स्पर्धेत आव्हान टिकवण्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या लढतीत मध्यंतराला मॅराडोना यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीची वैद्यकिय सेवा पुरवण्यात आली. सुरक्षारक्षक त्यांना डॅाक्टरांकडे नेत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने चाहते काऴजीत बुडाले.
लिओनेल मेसीच्या (14 मि.) गोलनंतर अर्जेंटिना संघाच्या पहिल्या सत्रातील खेळावर मॅराडोना प्रचंड नाराज होते. त्यात त्यांनी मद्य सेवनही केले.. त्यामुऴे सामना सुरु असताना ते अधुन मधुन डुलकी देत होते. 45 मिनिटांचा खेऴ झाल्यानंतर त्यांना अचानक चक्कर आली आणि त्यानंतर त्यांच्यावर लगेच उपचार करण्यात आले. या घटनेनंतर मॅराडोना यांच्या प्रकृतीसंर्दभात अनेक अफवा पसरल्या.
मात्र, मॅराडोना यांनी काही कालावधीनंतर आपल्या इंस्टाग्रामवर प्रकृती ठणठणीत असल्याची पोस्ट टाकली. त्यावर त्यांनी लिहिले की, " मी सर्वांना सांगु इच्छितो की, माझी प्रकृती उत्तम आहे. सामन्याच्या मध्यंतराला माझी मान प्रचंड दुखू लागली. त्यानंतर डॅाक्टरांनी उपचार केले. त्यांनी मला घरी जाण्याचा सल्ला दिला होता, परंतु संघ संकटात असताना मी कसा जाऊ शकत होतो ? ''