लिस्टर सिटी फुटबॉल क्लब मालकांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 09:19 AM2018-10-29T09:19:24+5:302018-10-29T09:19:36+5:30

इंग्लिश प्रीमिअर लीगमधील लिस्टर सिटी या फुटबॉल क्लबचे मालक विचाई श्रीवद्धानाप्रभा यांचा सोमवारी दुर्दैवी मृत्यू झाला.

Leicester City owner Vichai Srivaddhanaprabha and 4 others confirmed dead in tragic helicopter crash Sports | लिस्टर सिटी फुटबॉल क्लब मालकांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

लिस्टर सिटी फुटबॉल क्लब मालकांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

लंडन : इंग्लिश प्रीमिअर लीगमधील लिस्टर सिटी या फुटबॉल क्लबचे मालक विचाई श्रीवद्धानाप्रभा यांचा सोमवारी दुर्दैवी मृत्यू झाला. येथील किंग पॉवर स्टेडियमबाहेर त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आणि त्यात विचाईंसह पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. लिस्टर सिटी क्लबने या वृत्ताला दुजोरा दिला. चालकाचा हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. 


''विचाई यांच्या निधनाचे आम्हाला खूप दुःख झाले आहे. आमच्या यशस्वी वाटचालीत त्यांचा सिंहाचा वाटा होता,'' असे लिस्टर सिटीने ट्विट केले आहे. 
 



थायलंडमधील उद्योजक असलेल्या विचाई यांनी 2010 मध्ये लिस्टर सिटी क्लब खरेदी केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लिस्टर सिटीने 2015-16 च्या सत्रातील जेतेपद पटकावले. 


 

Web Title: Leicester City owner Vichai Srivaddhanaprabha and 4 others confirmed dead in tragic helicopter crash Sports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.