शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

ला लीगा : हायव्होल्टेज सामना बरोबरीत सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 12:43 AM

स्टार गेराथ बेले याने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर रेयाल माद्रिदने ला लीगा स्पर्धेतील हायव्होल्टेज सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी एफसी बार्सिलोनाला २-२ असे रोखले. या सामन्यात सर्वांचे लक्ष मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यावर लागले होते. दोघांनीही प्रत्येकी एक गोल नोंदवत अपेक्षित कामगिरी केली. मात्र गेराथचा गोल निर्णायक ठरल्याने त्याचीच चर्चा सर्वाधिक रंगली.

बार्सिलोना : स्टार गेराथ बेले याने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर रेयाल माद्रिदने ला लीगा स्पर्धेतील हायव्होल्टेज सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी एफसी बार्सिलोनाला २-२ असे रोखले. या सामन्यात सर्वांचे लक्ष मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यावर लागले होते. दोघांनीही प्रत्येकी एक गोल नोंदवत अपेक्षित कामगिरी केली. मात्र गेराथचा गोल निर्णायक ठरल्याने त्याचीच चर्चा सर्वाधिक रंगली.कॅम्प नाऊ येथे झालेल्या या रोमांचक सामन्यात लुईस सुआरेज याने दहाव्याच मिनिटाला गोल करीत बार्सिलोनाला सुरुवातीलाच आघाडीवर नेले. बार्सिलोना या जोरावर वर्चस्व गाजवणार असे दिसत असतानाच, चार मिनिटांनी रोनाल्डोने आपला जलवा दाखवत अप्रतिम गोल करून रेयाल माद्रिदला १-१ असे बरोबरीत आणले. मध्यांतराला दोन्ही संघांनी बरोबरी कायम राखली होती. दरम्यान, मध्यांतराच्या आधी सर्गेई रोबर्टो याची माद्रिदच्या खेळाडूंसह बाचाबाची झाल्याने पंचांनी त्याला लाल कार्ड दाखवले. यामुळे बार्सिलोनाला दहा खेळाडूंनिशी उर्वरित सामन्यात खेळावे लागले.दुसऱ्या सत्रात अडचणीत आलेल्या बार्सिलोनाने भक्कम बचाव करताना माद्रिदचे आक्रमण रोखण्यात यश मिळवले. ५२व्या मिनिटाला मेस्सीने वेगवान गोल करत बार्सिलोनाला आघाडीवर नेले. मात्र, ७२व्या मिनिटाला गेराथ बेलेने निर्णायक गोल करत रेयाल माद्रिदला बरोबरीवर आणले. अखेरच्या मिनिटापर्यंत २-२ ही बरोबरी कायम राखत दोन्ही संघांनी कोणताही धोका पत्करला नाही. यासह बार्सिलोनाने ला लीगा स्पर्धेतील आपली अपराजित मालिका कायम राखण्यात यश मिळवले.या सामन्यात माद्रिदचा स्टार आणि हुकमी एक्का रोनाल्डोच्या दुखापतीने पुन्हा एकदा डोके वर काढले. यामुळे त्याला मध्यांतरानंतर मैदानाबाहेर बसावे लागले. दरम्यान, आगामी २६ मे रोजी होणाºया लिव्हरपूलविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी तो तंदुरुस्त होईल, अशी आशा रेयाल माद्रिदला आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :FootballफुटबॉलSportsक्रीडा