फुटबॉलप्रेमाची हद्द झाली राव; 'पाच मिनिटात येतो' सांगून नवरदेवाची मैदानाकडे धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 17:21 IST2019-01-25T17:20:26+5:302019-01-25T17:21:00+5:30
फुटबॉलच्या वेडापायी कोण काय करेल याचा नेम नाही...

फुटबॉलप्रेमाची हद्द झाली राव; 'पाच मिनिटात येतो' सांगून नवरदेवाची मैदानाकडे धाव
कोची : फुटबॉलच्या वेडापायी कोण काय करेल याचा नेम नाही... आतापर्यंत फुटबॉलसाठी अनेकांनी परीक्षा बुडवणारे, कौटुंबीक कार्यक्रम, महत्त्वाची मिटींग विसरणारे पाहिले होते. मात्र, आज एक असा किस्सा घडला आणि जगाच्या पाठीवर असा फुटबॉलप्रेमी शोधून सापडणार नाही. केरळच्या रिदवाननं असं काही केलं की त्याच्या या वेडेपणावर हसावे की रागवावे हेच कळेनासे झाले आहे.
केरळ येथे होणाऱ्या मल्लपुरन 7-a-side फुटबॉल स्पर्धेतील फिफा मंजेरी या संघातीत रिदवान हा प्रमुख खेळाडू... मात्र, फिफा मंजेरी संघाच्या या बचावपटूसमोर मोठा पेच निर्माण झाला. संघाची अंतिम लढत आणि त्याच्या लग्नाची तारीख एकाच दिवशी आल्याने त्याच्यासमोर यक्षप्रश्नच निर्माण झाला. त्याला फुटबॉल किंवा लग्न यापैकी एकाचीच निवड करायची होती आणि मंजेरी संघाला त्याची अत्यंत गरज होती.
रिदवानच्या या फुटबॉलप्रेमाची दखल केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनीही घेतली आणि त्यांनी रिदवानची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली.
Ridvan asked 5 minutes from his bride on his wedding day to play football! What passion!
— Rajyavardhan Rathore (@Ra_THORe) January 25, 2019
I want to meet him! #5MinuteAur#KheloIndiahttps://t.co/BLLvpPr715