शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

विश्वकप फुटबॉल स्पर्धेसाठी इराण संघ गोव्यात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 11:44 IST

इराणचा २१ सदस्यांचा संघ ६ आॅक्टोबरपासून प्रारंभ होणा-या फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आज येथे डेरेदाखल झाला. इराण संघ पहाटे २.३० वाजता गोव्यात दाखल झाला.

मडगाव : इराणचा २१ सदस्यांचा संघ ६ आॅक्टोबरपासून प्रारंभ होणा-या फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आज येथे डेरेदाखल झाला. इराण संघ पहाटे २.३० वाजता गोव्यात दाखल झाला.इराणला ‘क’ गटात जर्मनी, गिनी व कोस्टारिका यांच्या साथीने ठेवण्यात आले. संघाची पहिली लढत ७ आॅक्टोबरला गिनीविरुद्ध होईल.अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत इराण संघाने तीन वेळा (२००१, २००९, २०१३) पात्रता मिळविली आहे. त्यात २००९ व २०१३ मध्ये साखळी फेरीचा अडथळा पार केला होता. इराणने २०१६ एएफसी अंडर-१६ चॅम्पियनशिपमध्ये ‘अ’ गटात अव्वल स्थान पटकावल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत व्हिएतनामचा व उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचा पराभव करीत आगामी विश्वकप स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे. संघाला अंतिम फेरीत इराकविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. चिली गोलकीपर कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुककोलकाता : चिलीचा गोलकीपर ज्युलियो बोरक्केज भारतात होणाºया फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. दक्षिण अमेरिका अंडर-१७ स्पर्धेत तो शानदार फॉर्मात होता. हाच फॉर्म कायम राखण्यास तो प्रयत्नशील आहे. मार्चमध्ये झालेल्या दक्षिण अमेरिका अंडर-१७ स्पर्धेत तो सर्वोत्तम गोलकीपर पुरस्काराचा मानकरी ठरला होता. बोरक्केजने चार सामन्यांत एकही गोल स्वीकारला नव्हता. त्याने १९९७ नंतर आपल्या संघाला फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेसाठी पात्रता मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सरावानंतर बोलताना बोरक्केज म्हणाला, ‘मी सर्वोत्तम कामगिरी करण्यास उत्सुक आहे. तोच फॉर्म कायम राखण्यात यशस्वी ठरेल. ही प्रतिष्ठेची स्पर्धा असून, सर्वच संघ मजबूत आहे. तुम्हाला खरोखरच चांगली तयारी करण्याची गरज आहे.’विश्वकप स्पर्धेच्या साखळी फेरीच्या लढतीत इंग्लंडचा सांचो खेळणार1कोलकाता : इंग्लंडचा जादोन सांचो फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत केवळ साखळी फेरीच्या लढतीमध्ये संघासाठी उपलब्ध राहणार आहे.2टीम अधिकाºयानेसांगितले, ‘जादोन सांचो कोलकातामध्ये संघासोबत जुळणार आहे. ‘८ आॅक्टोबरला चिलीविरुद्ध खेळल्या जाणाºया सलामी लढतीपूर्वी तो संघासोबत जुळण्याची आशा आहे.3या स्टार फॉरवर्डची इंग्लंडच्या २१ सदस्यांच्या संघात निवड झाली आहे. पण तो संघासोबत आलेला नाही, कारण त्याचा क्लब बोरुसिया डोर्टमंडने त्याला परवानागी दिलेली नाही. पण इंग्लंडच्या एफएने हस्तक्षेप केल्यानंतर बुंदेसलीगा या अव्वल क्लबने या १७ वर्षीय फॉरवर्डला स्टीव्ह कूपरच्या संघातर्फे केवळ साखळी फेरीतील लढतींमध्ये खेळण्याची परवानगी दिलेली आहे.4फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेला ब्राझीलचा युवा स्टार बिनिसियर ज्युनिअरची उणीव भासणार आहे. त्याला त्याचा क्लब फ्लेमेंगोने स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी दिलेली नाही.गिनी फुटबॉल संघ गोव्यातपणजी : १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी गिनी संघ मंगळवारी गोव्यात दाखल झाला.‘क’ गटात गिनी संघ आपला पाहिला सामना कोस्टारिकाविरुद्ध शनिवारी (दि.७) खेळणार आहे. स्पर्धेतील १६व्या फेरीत पोहचण्यासाठी हा संघ प्रयत्नशील असेल. त्यांचे प्रशिक्षक सोलेमन कामरा म्हणाले, की इतिहासात पहिल्यांदाच आमचा संघ बाद फेरीत पोहचू शकतो. स्पर्धा जिंकणार असे सांगणे घाईचे होईल; परंतु आमच्याकडे त्या दर्जाचे खेळाडू आहेत. ते व्यावसायिक खेळाडूकडे वाटचाल करीत आहेत.

टॅग्स :Sportsक्रीडाgoaगोवाFootballफुटबॉल2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017