उत्तर कोरियाकडून भारताचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 04:23 IST2019-07-14T04:23:52+5:302019-07-14T04:23:55+5:30

गतविजेत्या भारतीय फुटबॉल संघाला उत्तर कोरियाने ५-२ गोलने पराभूत केले.

India's defeat of North Korea | उत्तर कोरियाकडून भारताचा पराभव

उत्तर कोरियाकडून भारताचा पराभव

अहमदाबाद : गतविजेत्या भारतीय फुटबॉल संघाला उत्तर कोरियाने ५-२ गोलने पराभूत केले. इंटरकॉँटिनेंटल फुटबॉल चषक स्पर्धेतील भारताचा हा सलग दुसरा पराभव ठरला. स्पर्धेत भारतीय संघ ताजिकिस्तानकडून पराभूत झाला होता. या सामन्यात कर्णधार सुनील छेत्रीचे दोन गोल व्यर्थ ठरले होेते.
या पराभवानंतरही संघाच्या फायनलमध्ये स्थान मिळवण्याच्या आशा कायम आहेत;. उत्तर कोरिया ताजिकिस्तानकडून पराभूत झाला तर भारताला शेवटच्या सामन्यात सिरियाला मोठ्या अंतराने पराभूत करावे लागेल.
भारतासाठी पहिला गोल ५१ व्या मिनिटाला लालियानजुआला याने नोंदवला. त्यानंतर छेत्रीने ७१ व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवला.
उत्तर कोरियाकडून कर्णधार जोंग ग्वान, व शिनजिनने दोन तर हयोंग जिंग याने इन्जुरी वेळेत एक गोल नोंदवला.

Web Title: India's defeat of North Korea