मी पाच गर्लफ्रेंड्ससोबत एकाच वेळी रात्र घालवतो, स्टार फुटबॉलपटूच्या दाव्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 16:06 IST2022-05-11T16:06:03+5:302022-05-11T16:06:34+5:30
International News: फुटबॉल जगतातील शानदार स्ट्रायकर म्हणून ओळखला जाणारा नॉर्वेचा फुटबॉलपटू अर्लिंग हॉलेंड सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे. बोरुसिया डॉर्टमंड क्लबमधून इंग्लिश प्रिमियर लीगमधील क्लब मँचेस्टर सिटीकडे झालेल्या त्याच्या ट्रान्सफरची चर्चा सुरू आहे.

मी पाच गर्लफ्रेंड्ससोबत एकाच वेळी रात्र घालवतो, स्टार फुटबॉलपटूच्या दाव्याने खळबळ
ओस्लो - फुटबॉल जगतातील शानदार स्ट्रायकर म्हणून ओळखला जाणारा नॉर्वेचा फुटबॉलपटू अर्लिंग हॉलेंड सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे. बोरुसिया डॉर्टमंड क्लबमधून इंग्लिश प्रिमियर लीगमधील क्लब मँचेस्टर सिटीकडे झालेल्या त्याच्या ट्रान्सफरची चर्चा सुरू आहे. या ट्रान्सफरच्या चर्चांसोबतच हॉलेंड अजून एका कारणामुळे चर्चेत आहे. त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याच्या पाच गर्लफ्रेंड्स आहेत. तसेच त्या सर्वांसोबत मी रात्र घालवतो.
फुटबॉलच्या मैदानावर दणादण गोल करणाऱ्या अर्लिंग हॉलेंडने त्याच्या या विधानाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. नॉर्वेच्या लोकल मीडियासोबत झालेल्या चर्चेमध्ये अर्लिंग हॉलेंडने हे विधान केले होते.
मात्र वास्तवात चेंडूंना त्याने गर्लफ्रेंड्स म्हटले होते. त्याने म्हटले होते की, तो त्याच्या प्रत्येक हॅटट्रिकसाठी पाच चेंडूंसोबत झोपतो. तो म्हणाला होता की, तो आपल्या प्रत्येक हॅटट्रिकसाठी ५ चेंडूंसोबत झोपतो. मी बेडवर असतो आणि त्यांच्यासोबत मला बरं वाटतं. मी त्यांना रोज पाहतो, त्या माझ्या गर्लफ्रेंड आहेत.
सन २०२० मध्ये हॉलेंड बोरुसिया डॉर्टमंड क्लबशी जोडला गेला होता. आता तो हा क्लब लवकरच सोडणार आहे. डॉर्टमंडनंतर तो आता इंग्लिश प्रीमियर लीग क्लब मँचेस्टर सिटी असू शकतो.