शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

क्रोएशियाकडून १९९६ पेक्षा सरस कामगिरीची राकितिकला आशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 04:18 IST

क्रोएशिया १९९८ विश्वकप स्पर्धेनंतर यावेळी फुटबॉल विश्वकप स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरल्यानंतर खेळाडू इव्हान राकितिकला गेल्या वेळच्या तुलनेत यावेळी संघाची कामगिरी आणखी सरस ठरण्याची आशा आहे.

सोची  - क्रोएशिया १९९८ विश्वकप स्पर्धेनंतर यावेळी फुटबॉल विश्वकप स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरल्यानंतर खेळाडू इव्हान राकितिकला गेल्या वेळच्या तुलनेत यावेळी संघाची कामगिरी आणखी सरस ठरण्याची आशा आहे.क्रोएशियाने शनिवारी विश्वकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अतिरिक्त वेळेत लढत २-२ ने बरोबरीत राहिल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये यजमान रशियाचा ४-३ ने पराभव केला.बार्सिलोनाचा मिडफिल्डर राकितिक म्हणाला,‘आम्ही बरीच मेहनत घेतली आणि उपांत्य फेरी गाठण्यासाठी सर्वस्व झोकून दिले. क्रोएशियासारख्या देशासाठी ही मोठी उपलब्ध असून आम्ही आगेकूच करण्यास उत्सुक आहोत.’राकितिक पुढे म्हणाला,‘आम्ही विजयाचा आनंद घेण्यास इच्छुक असून १९९८ मध्ये जे घडले त्याचे दडपण बाळगत नाही. त्यावेळच्या खेळाडूंनी जे काही केले ते शानदार होते, पण आम्ही आमचा स्वत:चा इतिहास लिहिण्यास इच्छुक आहोत. आम्ही खेळाचा आनंद घेण्याबाबत सकारात्मक आहोत.’क्रोएशियाला बुधवारी उपांत्य फेरीत इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. त्यांचे लक्ष्य २० वर्षांपूर्वीची कामगिरी पिछाडीवर सोडण्याचे आहे.क्रोएशियाला १९९८ च्या विश्वकप स्पर्धेत यजमान फ्रान्सविरुद्ध उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर फ्रान्सने प्रथमच विश्वविजेतेपद पटकावले होते.विश्वकप स्पर्धेत नशीब यजमान देशासोबत नव्हते, अशी प्रतिक्रिया रशियाचे प्रशिक्षक चेर्चेसोव्ह यांनी व्यक्त केली. उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर ते बोलत होते.रशियाची वाटचाल शानदार होती. त्यांनी अंतिम १६ मध्ये स्पेनचा शूटआऊटमध्ये पराभव केला. रशिया शनिवारी क्रोएशियाविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत अतिरिक्त वेळत २-२ ने बरोबरीनंतर शूटआऊटमध्ये ३-४ ने पराभूत झाले.चेर्चेसोव्ह म्हणाले, ‘नशीब आमच्यासोबत नव्हते. आमचे खेळाडू युद्धाची तयारी करीत असल्याप्रमाणे भासत होते, पण त्यापूर्वीच त्यांची सेवा संपविण्यात आली.’चेर्चेसोव्ह पुढे म्हणाले,‘मी अद्याप या पराभवातून सावरलेलो नाही. स्पर्धेत सर्वांत तळाचे मानांकन असलेल्या रशियाकडून फार मोठ्या आशा नव्हत्या, पण त्यांनी आपल्या कामगिरीने चकित केले.’

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Footballफुटबॉल