हॉलिवूड स्टार्सनी गाजवला समारोप सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 04:02 IST2018-07-16T04:02:30+5:302018-07-16T04:02:46+5:30

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा ज्या दिमाखात झाला, त्याच जल्लोषात आणि उत्साहात या स्पर्धेचा समारोप समारंभही पार पडला.

The Hollywood filmmaker concludes the ceremony | हॉलिवूड स्टार्सनी गाजवला समारोप सोहळा

हॉलिवूड स्टार्सनी गाजवला समारोप सोहळा

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा ज्या दिमाखात झाला, त्याच जल्लोषात आणि उत्साहात या स्पर्धेचा समारोप समारंभही पार पडला. यावेळी हॉलिवूड स्टार्सनी अप्रतिम सादरीकरण करताना सोहळ्याला चारचाँद लावले.सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र राहिलेल्या अभिनेता आणि रॅपर विल स्मिथने सादर केलेल्या रॅपवर ठेका धरताना फुटबॉल चाहत्यांनी लुझनिकी स्टेडियम डोक्यावर घेतले. स्मिथसह अमेरिकन गायक निकी जॅम आणि इस्त्रेफी यांनीही सोहळ्यात रंगत आणली. विशेष म्हणजे या तिन्ही लोकप्रिय कलाकारांनी मिळून खास या स्पर्धेनिमित्त ‘लिव इट अप’ हे गाणं तयार केले होते. या गाण्याच्या सादरीकरणावर संपूर्ण स्टेडियम दणाणून गेले.
स्मिथ म्हणाला, ‘विश्वचषक स्पर्धेत सादरीकरण करण्याची संधी मिळणे मोठ्या सन्मानाची बाब आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने जगभरातील लोक एकत्रित जल्लोष करतात.’

Web Title: The Hollywood filmmaker concludes the ceremony